jagnnath पहाडिया.jpg 
देश

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोविड 19 ने निधन 

दैनिक गोमंतक

राजस्थान : राजस्थानचे (Rajasthan ) माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister)  जगन्नाथ पहाडिया (Jagannath Pahadia) यांचे काल (ता.19) कोविड 19 विषाणूमुळे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.  बुधवारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  आज त्यांच्यावर पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या मृत्यूवर राज्य सरकारने एक दिवसाचा राज्य शोक जाहीर केला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पहाडिया यांच्या मृत्यूची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरुण दिली आहे. तसेच दुखही व्यक्त  केले आहे.  'राज्याचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनाच्या बातमीने अत्यंत दुःखद होत आहे. पहाडिया यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री म्हणून दीर्घकाळ देशाची सेवा केली. ते देशातील ज्येष्ठ नेते होते. 'जगन्नाथ पहाडीया कोविड 19 मुळे आपल्यातून निघून गेले त्यांच्या मृत्यूने मला धक्का बसला आहे, असेही गेहलोत यांनी म्हटले आहे.  तसेच,  'सुरुवातीपासूनच त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते, त्यांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झाले असल्याचेही  गेहलोत यांनी म्हटल आहे.  (Former Rajasthan Chief Minister Jagannath Pahadia passes away) 

आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनामुळे शोकसभा होणार आहे. त्याचबरोबर पहाडिया यांच्या सन्मानार्थ राज्यात शोक दिवस आणि राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल, तसेच, 20 मे रोजी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सुट्टी असेल. अशी माहिती अधिकृत प्रवक्त्यानी दिली आहे.

कोण होते जगन्नाथ पहाडिया? 
जगन्नाथ पहाडिया यांच्या जन्म दलित कुटुंबातील 15  जानेवारी 1931 रोजी राजस्थानातील भारतपूर जिल्ह्यातील सध्याच्या भुसावर शहरात झाला. चंदा देवी आणि  नाथीलाल पहाडिया हे त्यांचे मातापिता होत.  शालेय शिक्षणानंतर जगन्नाथ पहाडिया यांनी  जयपूर आणि लॉ कॉलेज राजस्थान विद्यापीठातून वकिलीचे शिक्षण घेतले.  पहाडियां अत्यंत निडर  होते जे मानत असेल ते लगेच बोलून मोकळे होत असत.  त्याच्यातील गुणांची पारख करून तत्कालीन नेते मास्टर आदित्येंद्र यांनी 1957 मध्ये  पहाडिया यांना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भेटीला नेले. यावेळी पहाडिया केवळ 25 वर्षांचे होते. 

पंडित नेहरू यांनी पहाडिया यांना निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आणि पहाडिया यांनी 1957 मध्ये सवाईमाधोपूरच्या खासदारकीची निवडणूक बहुमताने जिंकली.  ते संजय गांधी यांचे खास होते. त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे संजय गांधीं यांच्याशी असणारे निकटचे संबंध. मात्र संजय गांधी यांच्या निधनानंतर त्यांचा धाक कमी झाला . तथापि, ते  2008 पर्यंत राजकारणात सक्रीय होते.  दरम्यान, मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी एकदा कवयित्री महादेवी वर्मा यांच्या कवितांवर टिप्पणी केल्यामुळे त्यांना  मुख्यमंत्री पद गमवावे लागले.  

6 जून 1980 ते 14 जुलै 1981 पर्यंत ते राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री होते आणि हे पद भूषविणारे राजस्थानमधील पहिले दलित नेते होते. ते बरीच वर्षे केंद्र सरकारमध्ये कनिष्ठस्तरीय मंत्री होते. तसेच  दुसर्‍या, चौथी, पाचव्या आणि 7 व्या लोकसभेचे सदस्य होते. सवाई माधोपूर (लोकसभा मतदारसंघ) आणि लोकसभा मतदारसंघ राजस्थान मधील बयाना मतदारसंघात त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या पत्नी शांती पहाडिया देखील लोकसभेच्या सदस्या होत्या.  3 मार्च 1989 ते 2 फेब्रुवारी 1990 पर्यंत ते  बिहारचे राज्यपाल होते. नंतर, 27 जुलै 2009 ते 26 जुलै 2014 पर्यंत हरियाणाचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली.
 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT