Former Karnataka MLA and Minister Pramod Madhavraj Dainik Gomantak
देश

कर्नाटकात काँग्रेसला झटका, माजी मंत्री प्रमोद माधवराज यांनी सोडला पक्षाचा 'हात'

कर्नाटकचे (Karnataka) माजी आमदार आणि मंत्री प्रमोद माधवराज यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

कर्नाटकचे माजी आमदार आणि मंत्री प्रमोद माधवराज यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपला राजीनामा कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्याकडे सोपवला आहे. माधवराज यांच्या राजीनाम्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अशातच या अटकळांना पूर्णविराम देत त्यांनी शनिवारी काँग्रेस (Congress) पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामाही ट्विट केला आहे. पक्षश्रेष्ठींनी माधवराज यांचे पक्षात कायम राहण्यासाठी मन वळविण्याचा प्रयत्न केला मात्र तो विफल ठरला. त्यांना कर्नाटक (Karnataka) प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षपदही देण्यात आले होते. (Former Karnataka MLA and Minister Pramod Madhavraj quits Congress)

दरम्यान, माधवराज यांनी काही वर्षे स्वत:ला पक्षकार्यापासून दूर ठेवले होते. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, आता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे आजपर्यंत त्यांच्याकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. कर्नाटक काँग्रेसचे मोठे नाव म्हणून पाहिले जाणारे माधवराज यांनी एका वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly Elections) होत असताना पक्षाचा राजीनामा दिला आहे. अशा स्थितीत त्यांनी पक्ष सोडणे हा एका मोठ्या झटक्यापेक्षा कमी नाही.

माधवराज राजीनाम्यात काय म्हणाले?

आपल्या राजीनामा पत्रात, माजी उडुपी आमदार माधवराज म्हणाले, "मी अशा टप्प्यावर पोहोचलो आहे, जिथे मला काँग्रेस पक्षात राहणे आणि नुकतेच माझ्याकडे सोपवण्यात आलेल्या नवीन पदाला न्याय देणे अशक्य होत आहे." "म्हणून, मी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षपद स्वीकारणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या गोष्टी तुमच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत आणि इतर पक्षाच्या नेत्यांनाही माझ्याकडून कळवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saptakoteshwar Temple History: शिल्पावशेषांतून उलगडतोय दिवाडीच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा इतिहास; कदंब स्थापत्याला नवा उजाळा

Iran America Conflict: "हबीबी, इराणला या!" युद्धाच्या धमकीवर तेहराननं उडवली ट्रम्पची खिल्ली; 3 डी गेमचा VIDEO केला शेअर

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; सुप्रीम कोर्टाचा 'MACP' संदर्भात महत्त्वाचा निर्णय

DJ Controversy: पुण्यात 'DJ'चा सवाल; गोव्यात नरकासुराचे काय?

Guru Gochar 2026: करिअरमध्ये मोठी झेप अन् छप्परफाड पैसा! गुरुच्या नक्षत्र परिवर्तनानं 4 राशी होणार मालामाल; गोल्डन टाईम सुरु

SCROLL FOR NEXT