vaccination of Foreigners Dainik Gomantak
देश

CoWIN वर नोंदणी करुन परदेशी नागरिकांनाही मिळणार लस

Vaccination: येणाऱ्याकाळात भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना लस घेण्यास अडचण येणार नाही.

दैनिक गोमन्तक

भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांची (Foreigner) सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government of India) एक मोठा निर्णय घेतला आहे. परदेशी नागरिकांनाही भारतात कोरोना लस (Covid-19 Vaccine) मिळू शकावी यासाठी सरकारने एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविड -19 लस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. आता भारतात राहणारे परदेशी नागरिक त्यांचा पासपोर्ट कोविन पोर्टलवर नोंदणीच्या उद्देशाने ओळखपत्र म्हणून वापरू शकणार आहेत. एकदा त्यांची या पोर्टलवर नोंदणी झाल्यावर त्यांना लसीकरणासाठी स्लॉट मिळेल. (Foreign nationals in India will also get the vaccine by registering on CoWIN)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मोठ्या संख्येने परदेशी नागरिक भारतात, विशेषत: मोठ्या शहरांमध्ये राहत आहेत. या भागात लोकसंख्येची घनता जास्त असल्याने कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थीतीचा सामना करण्यासाठी, सर्व पात्र व्यक्तींना लसीकरण करणे महत्वाचे आहे. या उपक्रमामुळे भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित होईल.

भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये वेगवेळ्या देशातील नागरिक शिक्षण आणि व्यवसायिक उद्देशाने काही ठराविक काळासाठी स्थायिक झालेले आहेत. त्या नागरिकांना कोरोना लसीचा डोस घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे आता येणाऱ्याकाळात भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना लस घेण्यास अडचण येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Mahika Sharma: हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिकानं दाखवलं आईचं रुप! चिमुकल्या अगस्त्यसाठी गर्दीत बनली 'ढाल' Watch Video

8th Pay Commission: नोकरी सरकारी, थाट 'लक्झरी'! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार 'बंपर' वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब पालटणार

VIDEO: अरेरे! रेड कार्पेटवर पाकिस्तानी उपपंतप्रधान तोंडावर पडले, सुरक्षारक्षकांनी कसंबसं सावरलं; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT