External Affairs Minister S. Jaishankar Dainik Gomantak
देश

युध्दापूर्वी रशियाकडून होणाऱ्या युरोपच्या तेल खरेदीत मोठी वाढ, नेमकं कारण काय?

रशियाविरुद्ध (Russia) कठोर भूमिका न घेतल्याने जगभरातील अनेक देश भारतावर टीका करत आहेत.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दीड महिन्यापासून युध्द सुरु आहे. रशियाकडून हे युध्द सुरु झाल्यामुळे अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. दुसरीकडे मात्र रशियाविरुद्ध कठोर भूमिका न घेतल्याने जगभरातील अनेक देश भारतावर टीका करत आहेत. या टीकेला आता भारताचे (India) परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, 'युरोप (Europe) युद्धापूर्वीच्या तुलनेत रशियाकडून जास्त तेल खरेदी करत आहे.' परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S. Jaishankar) यांनी ब्रिटनचे (Britain) परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांच्या उपस्थितीत ही टीका केली. जयशंकर म्हणाले, "जेव्हा तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा कोणताही देश आपल्या लोकांसाठी कोणते चांगले सौदे आहेत, हे पाहण्यासाठी बाजारात जातो आणि स्वाभाविक आहे.''

जयशंकर पुढे म्हणाले की, ''मला खात्री आहे की, जर आपण दोन-तीन महिने वाट पाहिली आणि प्रत्यक्षात रशियन तेल आणि वायूचे मोठे खरेदीदार कोण आहेत हे पाहिले, तर मला शंका आहे की यादी पूर्वीपेक्षा फार वेगळी नसेल. आम्ही त्या यादीतील पहिल्या 10 मध्येही नाही. जयशंकर यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा रशियाचे (Russia) परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.''

रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, 'भारताने आपला “अजेंडा” वाढवत सहकार्यात विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे.' जयशंकर म्हणाले की, ''आमची आजची बैठक आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत होत असून भारत नेहमीच संवाद आणि मुत्सद्देगिरीने मतभेद किंवा वाद सोडवण्याच्या बाजूने राहिला आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT