School

 

Dainik Gomantak 

देश

लहान भावाचे भांडण, बदला घेण्यासाठी मोठा भाऊ पोहोचला शाळेत तलवार घेऊन

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) मुंगेली येथे लहान भावाशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी 12 वीत शिकणारा विद्यार्थी तलवार घेऊन शाळेत पोहोचला.

दैनिक गोमन्तक

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) मुंगेली येथे लहान भावाशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी 12 वीत शिकणारा विद्यार्थी तलवार घेऊन शाळेत (School) पोहोचला. शिक्षक (Teacher) व विद्यार्थ्यांनी ते पाहिल्यानंतर व्हरांड्याच्या गेट भितीने आतून बंद केले. सुमारे तासभर हा विद्यार्थी (Students) बाहेर तलवार घेऊन विद्यार्थी व शिक्षकांना धमकावत राहीला. दरम्यान, शाळेत उपस्थित असलेले सर्वजण भीतीने शाळेच्या आतच थांबले. हे धक्कादायक प्रकरण मुंगेली जिल्ह्यातील सरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाओली उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये घडले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी (Police) आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वास्तविक, सहामाही परीक्षेसाठी शाळेत शिक्षक बैठक व्यवस्था करण्यात व्यस्त होते. दरम्यान, बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या लहान भावाचे दुसऱ्या विद्यार्थ्याशी भांडण झाले. आरोपींनी विद्यार्थ्यांशी हाणामारी केली. शिक्षक ब्रिजेश कौशिक यांनी त्याला अडवले असता त्याने घरी जाऊन तलवार आणली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याला तलवारीने पाहिले असता व्हरांडयाचे गेट आतून बंद केले. दरम्यान, विद्यार्थ्याने बाहेरुन तलवारी फिरवत सर्वांना धमकावत शिवीगाळही केली.

शिवाय, तिथे उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्याने या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला. दरम्यान, विद्यार्थ्याने शिक्षक ब्रिजेश कौशिक यांच्यासह अनेकांच्या गाडीची तोडफोड केली. हा विद्यार्थी बाओली येथील रहिवासी आहे. त्याचे धाकटे दोन भाऊ एकाच शाळेत शिकतात. याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाने सरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: 100 कोटींचा 'मालक'! दिल्लीत 2 कोटींचे आलिशान घर, 4 शहरांत प्रॉपर्टी... ऋषभ पंतची Net Worth ऐकून चक्रावून जाल

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

Codar: 'पूर्वी खांडोळा गावात मोठी वनराई होती, ती कापून त्यावर शहर बनवले'; कोडार आणि आयआयटीचा गोंधळ

अग्रलेख: धारगळ की वन म्हावळिंगे? भिजत घोंगडे; वेर्ण्यात उभारलेले सुसज्ज क्रिकेट मैदान

Rajmata Jijabai Karandak: अखेरच्या 10 मिनिटांत 2 गोल! गोव्याच्या महिलांना पराभवाचा धक्का; 'देविका' छत्तीसगडच्या विजयाची शिल्पकार

SCROLL FOR NEXT