Firefighters and a crane rescued 10 people at the Bawarchi Hotel Dainik Gomantak
देश

बावर्ची हॉटेलला आग, अग्निशमन दल आणि क्रेनच्या मदतीने 10 जणांची सुटका

हैदराबादमधील बावर्ची हॉटेलच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

दैनिक गोमन्तक

हैदराबाद: हैदराबादच्या रायदुर्गम पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या बावर्ची हॉटेलच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनेच्या वेळी इमारतीत अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

(Firefighters and a crane rescued 10 people at the Bawarchi Hotel)

ताज्या माहितीनुसार अग्निशमन विभागाने तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे. त्याचबरोबर क्रेनच्या सहाय्याने इमारतीत अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे पथक आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे मात्र अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार आग वेळीच आटोक्यात आणली, अन्यथा मोठी दुर्घटना होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

SCROLL FOR NEXT