Donkey Dainik Gomantak
देश

Rajasthan: पोलिस घेतायेत गाढवांचा शोध, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क !

Rajasthan News: राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या जोधपूरमध्ये एक अनोखी चोरीची घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Rajasthan: राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या जोधपूरमधून एक अनोखी चोरीची घटना समोर आली आहे. रात्री उशिरा जोधपूरच्या ग्रामीण भागातून 16 गाढवे चोरीला गेली आहेत. चोरट्यांनी रात्री उशिरा गावातील एका वाड्यातून एकामागून एक 16 गाढवांची चोरी केली. दरम्यान, गाढवाच्या मालकाने 16 गाढवांच्या चोरीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर जोधपूर ग्रामीण पोलिसांनी 16 गाढवांचा शोध सुरु केला.

दरम्यान, काल रात्री जोधपूर जिल्ह्यातील जैतीवास गावातून 16 गाढवे चोरीला गेली. गावातील रहिवासी भंवरलाल देवासी यांच्या घराजवळील शेडमधून चोरट्यांनी एकामागून एक 16 गाढवांची चोरी केली. भंवरलाल घराजवळील शेडमध्ये पोहोचले असता सर्व गाढवे गायब झाल्याचे आढळून आले. त्यामुळे भंवरलाल यांनी ग्रामीण पोलिस (Police) ठाण्यात 16 गाढवांच्या चोरीचा गुन्हा दाखल केला.

दुसरीकडे, भंवरलाल यांनी गावातील रहिवासी गुलाबराम लक्ष्मण राम आणि पुनाराम भट यांच्या विरोधात गाढवांच्या चोरीच्या संशयावरुन एफआयआर दाखल केला. हेड कॉन्स्टेबल बिराराम यांनी सांगितले की, 'भंवरलाल देवासी यांच्या अहवालावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गाढवांची चोरी केल्याचा आरोप असलेल्या तिघांची चौकशी सुरु करण्यात आली.'

माती वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो

वास्तविक, गाढवांचा उपयोग गावातील माती वाहून नेण्यासाठी केला जातो. गाढवांद्वारे माती वाहून नेण्याचा व्यवसाय भट समाजातील लोक करतात. यामुळेच भंवरलाल देवासी यांनी तीन लोकांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवून 16 गाढवे चोरल्याचा आरोप केला. गाढवांचा व्यवसाय करुनच आपला उदरनिर्वाह चालत असल्याचं भंवरलाल देवासी यांनी सांगितलं.

जोधपूरमध्ये गाढवांची संख्या कमी होत आहे

किंबहुना, जोधपूरसह विभागात गाढवांची संख्या सातत्याने कमी होत आहे, त्यामुळेच गाढवांची संख्या कमी झाल्याने त्यांच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. जोधपूर जिल्ह्याबद्दल बोलायचे झाल्यास, जिल्ह्यात एका गाढवाची किंमत 15000 ते 25000 वर पोहोचली आहे. वाढत्या किमतीमुळे या गाढवांची चोरी झाल्याचा पोलिसांचा समज आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तीन आरोपींची (Accused) चौकशी सुरु केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मनीष पांडेची चित्त्यासारखी झेप! हवेत उडून टिपला अफलातून झेल; विराट कोहलीही झाला 'शॉक', रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे मिथुन राशीत आगमन: 14 मे पासून 'या' 4 राशींचे नशीब फळफळणार; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार मोठे यश!

Goa Athletics: "हुकमी पदकविजेती, पण खिशात पैसे नाहीत!" साक्षी काळेची धाव आता आर्थिक अडचणींच्या ट्रॅकवर; आशियाई पॅरा गेम्समधील सहभागही टांगणीला

Margao Merchant Association: मडगावात पिंपळकट्ट्यावर भिकाऱ्यांचा उच्छाद, दारु पिऊन धिंगाणा; न्यू मार्केट व्यापारी संघटनेचा संताप

गोव्यात पर्यटकांच्या जिवाशी खेळ! समुद्रकिनारी बेदरकार गाडी चालवणं कोल्हापूरच्या पर्यटकाला पडलं महाग; पोलिसांनी दाखवला इंगा

SCROLL FOR NEXT