CBI  Dainik Gomantak
देश

CBI: नकली पासपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; लाखोंची लाच घेताना अधिकारी रंगेहात सापडला

CBI: आता यामध्ये आणखी काही संशयित असल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

CBI: सीबीआयने नकली पासपोर्ट बनवण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून याप्रकरणात अनेक अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, गंगटोक आणि कोलकत्ता या ठिकाणी क्षेत्रीय पासपोर्ट ऑफीसमधून पासपोर्ट मिळण्याबाबतच्या तक्रारीनंतर सीबीआयने सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये ५० ठिकाणी तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, या तपासादरम्यान गंगटोकच्या पासपोर्ट( PASSPORT ) ऑफीसमधून गौतम कुमार यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. त्यांना 1,90,000 रुपयांची लाच घेताना सीबीआयने रंगेहात पकडले आहे.

नकली पासपोर्ट बनवण्याच्या आरोपाखाली सरकारी अधिकारी आणि अन्य व्यक्ती मिळून २४ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, १६ अधिकाऱ्यांसहित २४ असे लोक आहेत जे लाच घेऊन भारतीय नसलेल्या व्यक्तींना खोट्या कागदपत्रांच्या आधारे नकली पासपोर्ट बनवून देत होते. आता सीबीआय( CBI ) कोलकाता, सिलीगुड़ी, गंगटोक आणि आणखी काही ठिकाणी तपास करत आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने एक व्यक्ती अशा नेटवर्कचा भाग आहे जे नेटवर्क नकली पासपोर्ट बनवून देते. आता यामध्ये आणखी काही संशयित असल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT