Ram Mandir Dainik Gomantak
देश

'प्राण प्रतिष्ठा होण्यापूर्वी रामललाच्या मूर्तीचे डोळे उघडता येणार नाहीत', व्हायरल फोटोवरुन मुख्य पुजारी सत्येंद्र दास संतापले

Ram Mandir: गेल्या काही तासांपासून अयोध्येतील श्री राम मंदिरातील मूर्तीचे फोटो व्हायरल होत आहेत. 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

Manish Jadhav

Ram Mandir: गेल्या काही तासांपासून अयोध्येतील श्री राम मंदिरातील मूर्तीचे फोटो व्हायरल होत आहेत. 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ही मूर्ती अद्याप उघडण्यात आलेली नाही. मात्र प्रभू रामाच्या मूर्तीचे डोळे उघडे असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरच आता, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दास म्हणाले की, "...प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी प्रभू रामाच्या मूर्तीचे डोळे उघड होऊ शकत नाहीत. ज्या मूर्तीमध्ये प्रभू रामाचे डोळे उघडे दिसतात ती खरी मूर्ती नाही. निवडलेल्या मूर्तीचे डोळे मिटलेले आहेत.”

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, मूर्तीची प्रतिष्ठापना झाली असून ती अद्याप उघडण्यात आलेली नाही. ते पुढे म्हणाले की, रामलल्लाची मूर्ती झाकण्यात आलेली आहे.

हा फोटो व्हायरल का झाला, याची चौकशी व्हायला हवी

दास पुढे म्हणाले की, ''असे फोटो व्हायरल होत असतील तर त्याची तात्काळ चौकशी करण्यात यावी. मूर्तीचे डोळे कोणी उघडले आणि हे फोटो कसे व्हायरल झाले याचा तपास करण्यात यावा.'' दरम्यान, प्रभू रामाचे 'बाल स्वरुप' दर्शवणारी ही मूर्ती, 1.5 टन वजनाची आणि म्हैसूर-स्थित कलाकार अरुण योगीराज यांनी डिझाइन केलेली आहे. विशेष म्हणजे, ही मूर्ती रामचरितमानस आणि वाल्मिकी रामायणात प्रभू रामाचे ज्या प्रकारे चित्रण केले आहे त्याप्रमाणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT