Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'त्यानं' माकडांनाही लावलं पळवून! डोकं हॅंग करणारा व्हिडिओ व्हायरल, तुम्ही पाहिला का?

Trending Video 2025: आता असाच एक छोटा पण अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे नेटकरीही चक्रावले आहेत.

Manish Jadhav

Trending Video 2025: सोशल मीडिया ही अतरंगी व्हिडिओ आणि फोटोंची एक वेगळीच दुनिया आहे. सहसा जे प्रकार खूप कमी पाहायला मिळतात किंवा अजिबात दिसत नाहीत, अशाच गोष्टी लोक रेकॉर्ड करुन किंवा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि त्या प्रचंड व्हायरलही होतात. तुमच्या टाइमलाईनवरही तुम्ही असे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताना पाहिले असतील आणि त्यांचा आनंदही घेतला असेल. आता असाच एक छोटा पण अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे नेटकरीही चक्रावले आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये काय दिसलं?

दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ खूपच छोटा असला तरी तो तेवढाच अनोखा आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, रस्त्याच्या कडेला काही केळी ठेवलेली आहे आणि एक व्यक्ती त्या केळीजवळ आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ती व्यक्ती माकडासारखी वाकून केळ्यांना धरुन बसलेली आहे आणि तिच्यासमोर एक माकड (Monkey) उभे आहे. ते माकड केळे उचलू इच्छिते, पण त्या व्यक्तीची 'अतरंगी' आणि विचित्र कृती पाहून ते स्वतःच घाबरते. सामान्यतः, माकडाला पाहून माणूस दूर होतो, पण या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीच्या विचित्र कृतीमुळे ते माकड घाबरुन पळ काढते. एवढेच नाहीतर त्याच्यासोबत असलेले दुसरे माकडही घाबरुन पळून जाते.

सोशल मीडियावर चर्चा

तुम्ही पाहिलेला हा व्हिडिओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर @naziya3030 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, "असे लोक कोणत्या दुनियेतून येतात." बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, "कुठून येतात यार हे लोक." दुसऱ्याने लिहिले की, "चांगला नमुना पकडला." तर तिसऱ्याने "मंगळ ग्रहावरुन तो आला..." अशी गंमतीशीर कमेंट केली आहे. तर दुसरीकडे, अनेक युजर्संनी हसण्याचे इमोजी शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

IND Vs ENG: जडेजाच्या 'त्या' निर्णयामुळे भारत हरला? अनिल कुंबळे म्हणतात...

इंग्लंडमध्ये '1947' च्या आठवणी ताज्या, राजीव शुक्लांनी किंग चार्ल्सना दिले 'स्कार्स ऑफ 1947' पुस्तक भेट!

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतंय? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, केंद्र सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

SCROLL FOR NEXT