BJP
BJP Dainik Gomantak
देश

Tamil Nadu Politics: निवडणुकीपूर्वी तामिळनाडूत एनडीएला सुरुंग, पोस्टरवरुन PM मोदी गायब

दैनिक गोमन्तक

Tamil Nadu Politics: तामिळनाडूमध्ये 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पक्ष आणि AIADMK च्या E. पलानीस्वामी (EPS) कॅम्पमधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

इरोड पूर्व विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी ईपीएसने आपला मित्रपक्ष भाजपपासून दुरावल्याचे सांगितले जात आहे. पक्ष कार्यालयात लावण्यात आलेल्या निवडणुकीच्या पोस्टरमधून भाजप आणि भाजप नेत्यांचे चेहरे गायब होते. पोस्टरमध्ये पीएम मोदींचेही नाव नाही.

दरम्यान, युतीचे नाव देखील भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) वरुन बदलून 'राष्ट्रीय लोकशाही पुरोगामी आघाडी' असे करण्यात आले आहे. या बदलावर मौन बाळगल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी याला नक्कीच उत्तर दिले जाईल, असे सांगितले आहे.

'भाजपला त्यांची स्थिती कळायला हवी'

एआयएडीएमकेच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'ईपीएसने भाजपला स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांनी तामिळनाडूतील (Tamil Nadu) स्थिती जाणून घेतली पाहिजे.

राज्याच्या राजकारणात ईपीएस आणि भाजप यांच्यातील ही राजकीय भांडणे जयललिता यांच्या निधनानंतर सुरु झाली, जेव्हा 234 जागांच्या विधानसभेत 4 जागा जिंकणाऱ्या भाजपने स्वतःला मुख्य विरोधी पक्ष म्हणून दाखवायला सुरुवात केली.'

पोटनिवडणुकीत ईपीएस आणि भाजपमध्ये टक्कर का दिसते?

अण्णाद्रमुकमध्ये दोन गट आहेत. एकाचे नाव ओ पनीरसेल्वम (ओपीएस) आणि दुसऱ्याचे नाव ई. पलानीस्वामी (ईपीएस) आहे. येथे भाजपची ईपीएसशी युती आहे.

मात्र, इरोड पूर्व विधानसभेच्या जागेवर होणाऱ्या निवडणुकीत ओपीएसने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आणि सांगितले की, या निवडणुकीत भाजपने पाठिंबा देण्यास सांगितले आहे, जर भाजपने स्वतःचा उमेदवार उभा केला तर आम्ही आमचा उमेदवारी मागे घेऊ.

तसेच, ओपीएसच्या या विधानामुळे ईपीएस आणि भाजप यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या वादाला खतपाणी मिळाले.

यानंतर भाजप आणि पीएम मोदी दोघेही ईपीएस पोस्टरवरुन गायब झाले आणि ईपीएसने युतीचे नावही बदलले. मात्र, यावर भाजपने ईपीएसला सडेतोड उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Goa Today's Live Update: मांगोर येथे घरफोडी; 2.5 लाखांचे दागिने, रोकड लंपास

Goa Crime News: शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून; पाच वर्षानंतर पती दोषी

Kotak Mahindra Bank: RBI च्या कारवाईनंतर कोटक महिंद्रा बँकेला ग्रहण, दोनच दिवसात गमावले 47 हजार कोटी; शेअर्समध्ये 13 टक्क्यांची घसरण

SCROLL FOR NEXT