Rajasthan Dainik Gomantak
देश

Rajasthan: बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना आरोपीच्या निकवर्तीयांकडून मारहाण Video

Rajasthan Crime: राजस्थानमधील एका गावात महिला स्वयंपाकासाठी लाकडूफाटा आणण्यासाठी गेली असता शेजाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला.

दैनिक गोमन्तक

Rajasthan Crime: राजस्थानमधील एका गावात महिला स्वयंपाकासाठी लाकडूफाटा आणण्यासाठी गेली असता शेजाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी बलात्काराची तक्रार दाखल केली, त्यामुळे आरोपीच्या निकवर्तीयांनी महिलेच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. हल्ल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

घटना कुठे घडली

ही घटना राजस्थानमधील (Rajasthan) कामा पोलीस स्टेशन हद्दीतील लालपूर गावातील आहे. स्वयंपाकासाठी लाकूडफाटा आणण्यासाठी गेलेल्या महिलेसोबतच गावातील शाहरुख नावाच्या तरुणाने बंदुकीच्या धाकावर बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित महिलेने (Woman) विरोध केला असता आरोपीच्या निकवर्तीयांनी तिच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पीडितेला काय म्हणायचे

याप्रकरणी पीडितेने कामा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिलेने सांगितले की, 'मी जवळच्या शेतात लाकडूफाटा आणण्यासाठी गेले होते. तिथे शाहरुखने माझ्या कनपट्टीवर बंदुक ठेवली. आवाज केलास तर जीवे मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने माझ्यावर बलात्कार केला. माझी आरडाओरड ऐकून शाहरुख तिथून पळून गेला. त्यानंतर माझे मेहुणे आले.'

तसेच, पीडितेच्या कुटुंबीयांनी शाहरुखच्या वडिलांकडे तक्रार केली. त्यानंतर आरोपीच्या निकवर्तीयांनी आमच्यावर हल्ला केला असल्याचे पीडितेच्या वडिलांनी सांगितले. कुटुंबीयांवर लाठ्या-काठ्यांनी अमानुष हल्ला करण्यात आला. यावेळी दगडफेकही करण्यात आली.

हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला

मारहाण आणि दगडफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. अनेक लोक घरात घुसून महिला आणि इतरांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT