Nude photo viral Dainik Gomantak
देश

गंभीर घटना: लग्न होताच संसार मोडला...

पीडित महिलेचे लग्न नवादा जिल्ह्यातील एका मुलासोबत निश्चित झाले होते. तेव्हापासून त्या तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होऊ लागले.

दैनिक गोमन्तक

बिहार (Bihar) राज्यातील जमुई जिल्ह्यातील एक गंभीर घटणा समोर आली आहे. घटणा जेवढी गंभीर आहे तेवढिच लाजिरवाणी सुध्दा आहे. एका व्यक्तीने सोशल मीडियावर एका विवाहित महिलेचे अश्लील फोटो व्हायरल केले. यामुळे त्या महिलेचे वैवाहिक जीवन पूर्णपणे संपुष्टात आले आहे. याच कारणामुळे पूर्वी दोनदा मुलीचे लग्न मोडले असल्याचेही सांगण्यात आले. ज्या व्यक्तीने ही घटना घडवून आणली त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून पुढील प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

त्या पीडित महिलेचे लग्न नवादा जिल्ह्यातील एका मुलासोबत निश्चित झाले होते. तेव्हापासून त्या तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होऊ लागले. नंतर त्या महीलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर जमुई पोलिस आणि सायबर सेलने याप्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा आरोपीचे नाव रोहित चौधरी असल्याचे समोर आले, तेव्हा त्याला नवादा येथून अटक करण्यात आली.

फेक फेसबुक आयडी बनवून केले फोटो शेअर

डीएसपी राकेश कुमार यांनी या या प्रकरणाची माहीता देतांना सांगितले की, या नवविवाहित जोडप्याचे काही फोटो मॉर्फ केले आणि एडिट केले गेले. मग ते फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल केले गेले. याप्रकरणात रोहित चौधरी नावाच्या त्या आरोपीला अटक करण्यात आली. त्या आरोपी तरुणाला लग्न मोडायचे होते. एवढेच नाही तर पीडितेच्या नावाने एक फेक फेसबुक आयडी बनवून तो सतत फोटो सुध्दा शेअर करत होता.

आरोपीची कारागृहात रवानगी

आरोपी रोहित चौधरी विरुद्ध गुन्हा क्रमांक-161/21, कलम-341/323/354/504/506/34 भादंवि आणि 66 सीआयटी कायदा-2000 दाखल करण्यात आला. मात्र काही दिवसांपूर्वी नवा संसार सुरु होण्याआधीच मोडल्यामुळे त्या मुलीला किती अडचणिंना सामोरे जावे लागेल हे मात्र कोणीही सांगू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT