जामनगर/गुवाहाटी: मागच्या पायाच्या मांडीचे हाड मोडलेल्या आसाममधील ‘राजा’ या हत्तीच्या सात आठवड्यांच्या पिल्लाला ‘वनतारा’चे संस्थापक अनंत अंबानी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आज ‘वनतारा’मध्ये उपचारांसाठी विमानाने आणण्यात आले. अंबानी यांनी प्राण्याला उपचारासाठी विमानाने नेल्याची भारतातील ही तिसरी घटना असल्याचे सांगितले जात आहे.
रिलायन्स उद्योगसमूहाच्या ‘वनतारा’ या प्राणी शुश्रूषा केंद्राचे संस्थापक अनंत अंबानी यांच्यामुळे या हत्तीच्या पिल्लाला विमानाने त्वरेने जामनगर येथे आणणे शक्य झाले. अन्यथा त्याला रस्त्याने ट्रकमधून आणण्यासाठी बरेच दिवस लागले असते. आता त्याच्यावर ‘वनतारा’ येथे विशेष वैद्यकीय उपचार केले जातील. ‘राजा’ला कदाचित आयुष्यभर उपचारांची आणि विशेष देखरेखीची गरज लागली, तर ती गरज पूर्ण करण्याची तयारी ‘वनतारा’ने दर्शवली आहे.
हत्तींच्या रुग्णालयात हलविणार
‘राजा’ला ‘वनतारा’मधील हत्तींच्या रुग्णालयात हलवण्यात येईल. तेथे तपासणी करून त्याला वेदनाशामक औषधे, त्याची तब्येत सुधारण्याकरिता अन्य औषधे, त्याची हालचाल सुरू व्हावी यासाठी व्यायाम आणि त्याचे कुपोषण भरून काढण्यासाठी विशेष खाद्यपदार्थ दिले जातील. त्याला आयुष्यभर औषधोपचार आणि देखरेख लागली तर ती देण्याची तयारीदेखील ठेवली आहे, असे ‘वनतारा’चे सीईओ विव्हान करनी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.