Gujarat-Himachal Election Dainik Gomantak
देश

Gujarat-Himachal Election: गुजरात, हिमाचलमध्ये 'इतके' कोटी रूपये जप्त

निवडणूक आयोगाची कारवाई; गत निवडणुकीपेक्षा पाचपट अधिक रक्कम, मोठ्या प्रमाणात मद्यसाठाही जप्त

गोमन्तक डिजिटल टीम

Gujarat-Himachal Election: देशातील गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर दोन्ही राज्यात जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच आता दोन्ही राज्यांमध्ये मिळून मोठ्या प्रमाणात रोकड आणि मद्य जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

हिमाचल प्रदेशात शनिवारी मतदान होणार आहे तर गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर रोजी अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. विशेष म्हणजे, 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत पाच पट अधिक रोकड आणि मद्य जप्त करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, गुजरातमध्ये आचारसंहिता सुरू असताना गेल्या काही दिवसांच्या काळात 71.88 कोटी रूपये रोकड जप्त करण्यात आली आहे. 2017 च्या निवडणुकीत गुजरातमध्ये 27.21 कोटी रूपये जप्त करण्यात आले होते.

तर हिमाचल प्रदेशात आत्तापर्यंत 50.28 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 2017 च्या निवडणुकीत हिमाचल प्रदेशात 9.03 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. म्हणजेच हिमाचल प्रदेशात यंदा जप्त करण्यात आलेली रोकड ही गत निवडणुकीतील रकमेपेक्षा पाच पट अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT