Arrested Dainik Gomantak
देश

Mizoram: मिझोराममध्ये पिता-पुत्राला 10 वर्षांची शिक्षा, अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी आढळले दोषी

Drug Trafficking In Mizoram: मिझोराममध्ये एका वृद्ध व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Manish Jadhav

Drug Trafficking In Mizoram: मिझोराममध्ये एका वृद्ध व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चंफई जिल्ह्यातील एका न्यायालयाने एका वृद्ध व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात दोषी ठरवले आहे. निकाल देताना न्यायालयाने 78 वर्षीय लालबिसिया आणि त्यांचा मुलगा 40 वर्षीय लालनंटलुआंगा यांना 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी जुलैमध्ये 271 ग्रॅम हेरॉईन जप्त केल्यानंतर पिता-पुत्राला अटक करण्यात आली होती.

दरम्यान, जप्त केलेल्या अमली पदार्थांची अंदाजे किंमत 1.35 कोटी रुपये आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश लियांगसांगजुआला यांनी दोघांना नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत दोषी ठरवले आणि त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दोघांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून तो न भरल्यास त्यांना आणखी सहा महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

म्यानमारमधून पळून गेलेले 45 सैनिक मिझोराममध्ये पोहोचले

त्याचवेळी, 'पीपल्स डिफेन्स फोर्स' या मिलिशिया ग्रुपने म्यानमारच्या चिन राज्यातील लष्करी छावणी ताब्यात घेतल्यानंतर आणखी दोन सैनिक मिझोराममध्ये आले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत म्यानमारचे एकूण 45 सैनिक मिझोरामला आले होते. या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, केंद्राच्या सूचनेनुसार, सैनिकांना आसाम रायफल्सकडे सोपवण्यात आले आणि त्या सर्वांना भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी विमानाने सुरक्षित ठिकाणी पाठवले.

ते म्हणाले की, सर्वप्रथम म्यानमारचे 39 सैनिक मिझोराममध्ये दाखल झाले आणि सोमवारी संध्याकाळी पूर्व मिझोराममधील चंफई जिल्ह्यातील सीमावर्ती गाव जोखावथरमधील पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पुढे सांगितले की, मंगळवारी दुपारी आणखी तीन सैनिक म्यानमारमधून पळून गेले आणि इतर दोघे मंगळवारी संध्याकाळी जोखावथर पोलीस ठाण्यात पोहोचले. अधिकाऱ्याने सांगितले की, आसाम रायफल्सने मंगळवारी 39 सैनिकांना सुरक्षित स्थळी हलवले आणि उर्वरित सहा सैनिकांना बुधवारी सुरक्षित स्थळी नेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT