Sonia Gandhi  Dainik Gomantak
देश

Sonia Gandhi ना ईडीने पाठवले नवे समन्स; 26 जुलैला हजर राहण्याचे दिले आदेश

National Herald Case News: नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नव्याने समन्स पाठवले आहे.

दैनिक गोमन्तक

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नव्याने समन्स पाठवले आहे. त्यांना आता 25 जुलैऐवजी 26 जुलैला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सोनिया गांधींची चौकशी केली होती. ही चौकशी सुमारे तीन तास चालली. त्यानंतर तपास यंत्रणेने त्यांना सोमवारी म्हणजेच 25 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्राही होत्या. सोनिया गांधी अलीकडेच कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत, त्यामुळे कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

दुसरीकडे, याप्रकरणी ईडीने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही चौकशी केली आहे. त्याचवेळी काँग्रेसने ईडीच्या कारवाईचा निषेध करत हा राजकीय सूड असल्याचे म्हटले होते. या चौकशीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशव्यापी निदर्शने केल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

शिवाय, सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची जूनच्या पहिल्या आठवड्यात चौकशी होणार होती, मात्र त्यांना कोविड-19 ची लागण झाल्यामुळे ही चौकशी 23 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. सोनिया गांधींनी केंद्रीय एजन्सीकडे चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. गेल्या महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची विनंती ईडीने (ED) मान्य केली आणि त्यानंतर नव्याने समन्स जारी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT