Sonia Gandhi Dainik Gomantak
देश

सोनिया गांधींना ईडीने पुन्हा बजावले समन्स, 23 जूनला होणार चौकशी

नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (Ed) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा समन्स बजावले आहे.

दैनिक गोमन्तक

नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (Ed) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. आता ईडीने त्यांना 23 जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर सोनिया गांधींनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. यापूर्वी, ईडीने 8 जून रोजी सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलावले होते, परंतु त्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान, या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाही समन्स बजावले होते. तपास यंत्रणेने 13 जून रोजी राहुल गांधींना (Rahul Gandhi) चौकशीसाठी बोलावले आहे. एजन्सीने समन्स बजावल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर सरकारी यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला.

काँग्रेस पक्ष शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत

13 जूनला राहुल गांधींच्या चौकशीच्या दिवशीही काँग्रेस पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि संघटना प्रभारी के.सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी AICC सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

ईडी कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

बैठकीत 13 जूनच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. दिल्लीसह (Delhi) देशभरातील ईडी कार्यालयांसमोर सत्याग्रह करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यासह पक्षाने दिल्लीतील ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पक्षाने यापूर्वीच सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदार, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश प्रभारींना 13 जून रोजी सकाळी 9:30 वाजेपर्यंत पक्ष कार्यालयात पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT