Blood Test To Detect Breast Cancer Early Dainik Gomantak
देश

Breast Cancer: रक्ताच्या चाचणीतून ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करणारी चाचणी भारतात उपलब्ध

Blood Test To Detect Breast Cancer Early: रक्ताच्या चाचणीमधून ब्रेस्ट कॅन्सरचं 99% अचूक निदान हे सुरूवातीच्या टप्प्यांतच करता येऊ शकतं असा तज्ञांचा दावा आहे.

दैनिक गोमन्तक

कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. पण जर कॅन्सर सुरूवातीच्या टप्प्यातच ओळखता आला तर त्यावर मात करणं शक्य आहे. हा आजार महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. हा सुरूवातीच्या टप्प्यात ओळखण्यासाठी आता रक्ताची चाचणी करता येणार आहे. भारतामध्ये 22 जून दिवशी ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. Datar Cancer Genetics या खाजगी कंपनीने अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटल सोबत ही उपलब्ध केली आहे. (Blood Test To Detect Breast Cancer Early news)

40 वर्षांवरील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करण्यासाठी ही रक्ताची चाचणी मदत करणार आहे. युरोपसह जगभरातील 15 देशांमध्ये या टेक्निकचा वापर केला जातो. रक्ताच्या चाचणीमधून 99% अचूक निदान हे सुरूवातीच्या टप्प्यांतच करता येऊ शकतं असा तज्ञांनी दावा केला आहे.

कॅन्सर (Cancer) वरील उपचार हा खर्चिक आणि वेदनादायक असतो. हा खर्च कमी करायचा असेल तर कॅन्सरचं निदान वेळेत करणे गरजेचे आहे. महिलांमध्ये कॅन्सर सुरूवातीच्या टप्प्यात ओळखता आला तर त्यावर लवकर उपचार सुरू करून आयुष्य वाढवता येते.

जागतिक आरोग्य संघटनेकडून, US Food and Drug Administration या रक्ताच्या चाचणीला मान्यता मिळाली आहे. स्टेज 0 ते 1 मधील ब्रेस्ट कॅन्सर 99% अचूक या रक्ताच्या चाचणीमध्ये ओळखता येतो. या टेस्टला 'Easy Check Breast' असं नाव देण्यात आलं आहे. अमेरिकेत US Food and Drug Administration ने नोव्हेंबर 2021 मध्येच मान्यता दिली आहे. 40 वर्षांवरील लक्षणं असलेल्या नसलेल्या सार्‍यांसाठी ही एक वार्षिक टेस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे. या चाचणीचा खर्च 6000 रूपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT