Earthquake In Manipur Dainik Gomantak
देश

Earthquake In Manipur: मणिपुरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 3.3 तीव्रता

मणिपुरमध्ये आज सकाळी भुकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Puja Bonkile

Earthquake In Manipur: मणिपुरमध्ये आज सकाळी 12 च्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर 3.3 एवढी होती. अशी माहिती नॅशल सेंटर सिमोलॉजी ने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मणिपूरमध्ये सकाळी 12.14 वाजता भूकंप झाल्याने पृथ्वी हादरली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, मणिपूरमधील उखरुलच्या नैऋत्येला 13 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले आहे. अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही.

  • भूकंपाचे शास्त्रीय कारण देखील जाणून घ्या

भूकंप कसे आणि का होतात हे शास्त्रीयदृष्ट्या समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. वास्तविक ही पृथ्वी टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्याच्या खाली द्रव लावा आहे.

या प्लेट्स सतत तरंगत राहतात आणि अनेक वेळा एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे अनेक वेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जास्त दाब आल्यावर या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून बाहेर पडणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि या गडबडीनंतर भूकंप होतो.

  • भूकंप आल्यावर काय करावे आणि काय करू नये?

धक्के जाणवल्यास ताबडतोब जमिनीवर बसा आणि आपले डोके खाली टेकवा.

मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वतःचा बचाव करावा.

याशिवाय घरातील वडीलधाऱ्यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्यावी. 

त्यांना प्रथम बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा. 

जर भूकंपाचा धक्का खूप तीव्र असेल तर काळजीपूर्वक घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर जावे. 

याशिवाय भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड आणि पडणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT