Earthquake Dainik Gomantak
देश

Andaman Nikobar: अंदमान आणि निकोबार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले, 5.0 रिश्टर स्केल तीव्रता

Earthquake in Andaman Nikobar: अंदमान निकोबार आणि पोर्ट ब्लेअरमध्ये आज भूकंपाचे धक्के 5.0 तीव्रतेचे धक्के जाणवले.

दैनिक गोमन्तक

पोर्ट ब्लेअर (Port Blair) आणि अंदमान निकोबार बेटांपासून 215 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 5.0 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, मंगळवारी सकाळी 5:57 वाजता बेटांवर भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपात अद्याप कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याची माहीती मिळाली नाही. (Earthquake in Andaman Nikobar News)

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने आपल्या एका ट्विटमध्ये या भूकंपाची माहिती दिली. भूकंपाचा (Eartquake) केंद्रबिंदू जमिनीपासून 44 किमी खोलीवर होता. आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास पोर्ट ब्लेअरपासून 244 किमी आग्नेयेला 4.4 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. बेटावर सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

* जम्मू-काश्मीरमध्ये कमी तीव्रतेचा भूकंप

अलिकडेच जम्मू-काश्मीरच्या डोडा (Doda) जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 इतकी मोजण्यात आली. भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. डोडा जिल्ह्यात सोमवारी दुपारी १२.१२ वाजता भूकंपाचे कमी तीव्रतेचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू पाच किलोमीटर खोलीवर होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT