Dwarka DCP Shankar Chaudhary Dainik Gomantak
देश

महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी द्वारका डीसीपींना पदावरुन हटवले, तपास सुरु

महिलेसोबत काल रात्री एका पबमध्ये गैरवर्तन केल्याच्या आरोपावरुन द्वारका डीसीपी शंकर चौधरी यांना त्यांच्या पदावरुन तत्काळ हटवण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

महिलेसोबत काल रात्री एका पबमध्ये गैरवर्तन केल्याच्या आरोपावरुन द्वारका डीसीपी शंकर चौधरी यांना त्यांच्या पदावरुन तत्काळ हटवण्यात आले आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार शंकर चौधरी यांना पोलीस मुख्यालयात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, प्रत्यक्षात काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास पबमधून पीसीआर कॉल आला, ज्यामध्ये महिलेशी (Women) गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला. महिलेच्या पतीने आयपीएस अधिकारी आणि डीसीपी द्वारका शंकर चौधरी यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. फोन करणाऱ्याने पीसीआर कॉलवर सांगितले की, 'डीसीपी शंकर चौधरी यांनी दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यावर काच मारली. महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर तिला मॅक्स साकेत रुग्णालयात नेण्यात आले.'

तसेच, हायप्रोफाईल प्रकरणामुळे त्यांना पदावरुन हटवण्यात आले. शनिवारी पीडित महिलेचे वक्तव्यही समोर आले. महिलेने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, 'काल रात्री मी कुटुंबासह बर्थडे पार्टीसाठी पबमध्ये गेले होते.' तिथे डीसीपी शंकर चौधरी कुटुंबासह उपस्थित होते. महिलेच्या म्हणण्यानुसार, यावेळी माझ्या डोक्यात बाटली फोडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IDC E Auction: गोव्यात 50 भूखंडांचा ई-लिलाव; वेर्णा, लाटंबार्से अन् किटलातील भूखंडांसाठी 'आयडीसी'ची नोटीस जारी

Goa Grand Alliance: 'जनभावनेला प्राधान्य, घाईगडबडीत निर्णय नाही'; ग्रँड अलायन्सवर विजय सरदेसाईंची भूमिका स्पष्ट

खरी कुजबुज: 'ते' नेते विजयना स्‍वीकारणार?

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.15, 2.28 की 2.57? 8व्या वेतन आयोगात बेसिक पे किती वाढणार, तुमचा पगार आणि एरियर कसा मोजला जाणार? पाहा संपूर्ण गणित

Goa Foundational Learning Survey: पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचा आता 'लर्निंग सर्व्हे'; वाचन, लेखन अन् गणितातील पायाभूत कौशल्यांची कमतरता शोधणार

SCROLL FOR NEXT