Smoking With Tea Dainik Gomantak
देश

Smoking With Tea: चहासोबत सिगारेट पिणाऱ्या लोकांसाठी धोक्याची घंटा, कर्करोगाचा वाढता धोका

Smoking With Tea: फक्त सिगारेट ओढणाऱ्या लोकांना देखील धूम्रपानामुळे ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट स्ट्रोकचा धोका वाढतो.

Pramod Yadav

Smoking With Tea

चहाच्या टपरीवर अनेकदा चहासोबत सिगारेट ओढताना लोक तुम्हाला दिसतील. ताणतणाव कमी करण्यासाठी लोक चहासोबत सिगारेट ओढतात. पण, ही एक अत्यंत वाईट सवय असून, चहा आणि सिगारेटचे मिश्रण तुमच्या शरीरासाठी घातक ठरु शकते.

चहा आणि सिगारेट एकत्र सेवन केल्यास अन्ननलिका कर्करोगाचा धोका 30 टक्क्यांनी वाढतो, असे एका अहवालात असे म्हटले आहे.

चहामध्ये आढळणारे कॅफीन सिगारेटसोबत मिसळल्यास प्राणघातक ठरू शकते, असे या अहवालात म्हटले आहे. इतरांपेक्षा कूल किंवा तणावातून मुक्त दिसण्यासाठी चहा-सिगारेट एकत्र पितात त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.

Anals of Internal Medicine या जर्नलमध्ये 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, गरम चहामुळे अन्ननलिकेच्या पेशींना नुकसान होते आणि तुम्ही चहासोबत सिगारेट ओढता तेव्हा नुकसान होण्याचा धोका दुप्पट होतो. ही सवय जास्त दिवस चालू ठेवल्यास कॅन्सरसारखा घातक आजार होऊ शकतो, असे हा अहवाल सांगतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये कॅफिन असते यामुळे पोटात एक प्रकारचे ॲसिड तयार होते. हे पचनासाठी उपयुक्त आहे, परंतु कॅफिनचे प्रमाण जास्त असल्यास ते पोटात गेल्यास नुकसान होऊ शकते.

त्याचबरोबर सिगारेट किंवा विडीमध्ये निकोटीन आढळते. रिकाम्या पोटी चहा आणि सिगारेट एकत्र प्यायल्यास डोकेदुखी आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

चहा आणि सिगारेट एकत्र प्यायल्यास कोणते धोके निर्माण होतात?

हृदयविकाराचा धोका

पोटाचा अल्सर

स्मृती भ्रंश

फुफ्फुसाचा कर्करोग

घश्याचा कर्करोग

नपुंसकत्व आणि वंध्यत्व

अन्ननलिकेचा कर्करोग

हात आणि पायांवर व्रण

एवढेच नव्हे जे लोक फक्त सिगारेट ओढतात त्यांच्यासाठी देखील ते हानिकारक असते. धूम्रपानामुळे ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट स्ट्रोकचा धोका वाढतो.

असे अनेक संशोधन केले गेले आहेत ज्यात असे समोर आले आहे की जे लोक दिवसातून एक सिगारेट ओढतात त्यांना सामान्य लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 7 टक्के जास्त असतो. जर तुम्हाला धूम्रपानाची सवय असेल तर ते तुमचे आयुष्य सुमारे 17 वर्षांनी कमी करू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

Goa Politics: 'त्या' वर्तणुकीची जबाबदारी आमदाराची कशी? सरदेसाईंनी माफी मागण्यास दिला नकार; कोळसा मुद्द्यावरुन काब्रालही आक्रमक

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT