Crime News Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: माणूस म्हणावे की हैवान! प्रेमविवाह केलेल्या पत्नी आणि आठ महिन्याच्या मुलीची कुऱ्हाडीने केली हत्या

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. पोलीस गावातील लोकांचीही चौकशी करत आहेत. आरोपीच्या कुटुंबात नेमका कोणता वाद सुरु होता हे ही पोलीस जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दरम्यान, दुहेरी हत्याकांडाची ही हृदयद्रावक घटना बदायूंमधील दाता गंज पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील भुदेली गावात एका व्यक्तीने पत्नी आणि निष्पाप मुलीची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या केली.

या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली. या घटनेनंतर नागरिकांकडून (Citizens) तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दुसरीकडे, घटनेनंतर गावातील लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव असे आरोपीचे नाव आहे. दिल्लीच्या खुशबूशी दोन वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केला होता. खूशबूने आठ महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता.

पती-पत्नीमध्ये वाद सुरु होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये वाद सुरु होता. अटक केलेल्या व्यक्तीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना दोघांमधील वादाचे कारण समजू शकेल.

नुकतेच एका मुद्द्यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. बदायूंचे एसएसपी डॉ. ओ.पी. सिंग या प्रकरणाची वैयक्तिक चौकशी करत आहेत. त्यानुसार आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT