Ramdev Baba  Dainik Gomantak
देश

'जनतेची दिशाभूल करु नका...,' रामदेव बाबांना दिल्ली HC ने फटकारले

Yoga guru Ramdev Baba: दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी योगगुरु रामदेव बाबा यांना अ‍ॅलोपॅथी आणि कोरोना उपचारांवरुन फटकारले आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी योगगुरु रामदेव बाबा यांना अ‍ॅलोपॅथी आणि कोरोना उपचारांवरुन फटकारले आहे. जनतेची दिशाभूल करु नका, असे न्यायालयाने म्हटले आहे. तुमचे अनुयायी, शिष्य आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार्‍या लोकांचे स्वागत आहे. मात्र उथळपणाने बोलून कोणाचीही दिशाभूल करु नका, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. योगगुरु रामदेव बाबा यांच्यावर कोरोना उपचाराबाबत चुकीच्या माहितीचा प्रसार केल्याचा आरोप आहे.

खरे तर, योगगुरु रामदेव बाबा (Yoga guru Ramdev Baba) यांनी कोरोना रुग्णांवर ज्या पध्दतीने डॉक्टरांनी उपचार केले त्यावरुन टीका केली होती. 2021 मध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, कोरोना (Corona) संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या काही औषधांवर बाबा रामदेवांनी प्रश्न उपस्थित केले होते. COVID-19 साठी अ‍ॅलोपॅथिक औषधे घेतल्यानंतर लाखो लोक मरण पावले, असे बाबा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन डॉक्टरांच्या संघटनांनी निषेध नोंदवला होता. त्याचवेळी दिल्ली मेडिकल असोसिएशनने दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिकाही दाखल केली होती.

'अ‍ॅलोपॅथीला आपली प्रतिष्ठा वाचवायची आहे'

दिल्ली मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती भंबानी म्हणाले, "माझी चिंता आयुर्वेदाचे नाव आणि प्रतिष्ठा वाचवण्याची आहे. अ‍ॅलोपॅथीच्या विरोधात कोणाचीही दिशाभूल होऊ नये हा माझा उद्देश आहे.'' न्यायालयाने पुढे म्हटले की, 'मी लस घेणार नाही असे म्हणणे वेगळी गोष्ट आहे, परंतु लस विसरा असे म्हणणे चुकीचे आहे. कोरोना लस घेणे ही एक वेगळी गोष्ट आहे.'

आयएमएने माफी मागावी अशी मागणी केली होती

इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) रामदेव बाबा यांच्या अ‍ॅलोपॅथी आणि अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांविरुद्ध केलेल्या कथित वक्तव्याबद्दल त्यांना मानहानीची नोटीस बजावली होती. 15 दिवसांच्या आत त्यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT