Dibrugarh bound IndiGo flight diverted to Guwahati  Dainik Gomantak
देश

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दोन आमदार होते विमानात अन् वैमानिक म्हणाला, 'इंजिनमध्ये बिघाड झालाय'

आसाममधील गुवाहाटीहून दिब्रुगडला जाताना रविवारी सकाळी ही घटना घडली.

गोमन्तक डिजिटल टीम

Dibrugarh bound IndiGo flight diverted to Guwahati: 'विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला' इंडिगोच्या विमानात वैमानिकाने असे सांगताच एकच खळबळ निर्माण झाली. त्यानंतर विमान गुवाहाटी येथील गोपीनाथ बोर्डोलोई इंटरनॅशनलच्या दिशेने वळवण्यात आले आणि त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. आसाममधील गुवाहाटीहून दिब्रुगडला जाताना रविवारी सकाळी ही घटना घडली.

विमानात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि भाजपचे दोन आमदार प्रशांत फुकन आणि तेराश गोवाला यांच्यासह 150 हून अधिक प्रवासी होते. दरम्यान, विमानाचे यशस्वीरित्या इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. लँडिंग होताच विमानतळ प्रशासन विमानाची तपासणी करत आहेत.

मी भाजप आमदार प्रशांत फुकन आणि तेराश गोवाला यांच्यासोबत इंडिगोच्या फ्लाइटमध्ये होतो. गुवाहाटी विमानतळाकडे वळवण्याआधी विमान 15 ते 20 मिनिटे हवेतच राहिले. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट क्रमांक 6E2652 ने सकाळी 8.40 च्या सुमारास गुवाहाटीहून उड्डाण केले आणि 20 मिनिटांत पुन्हा विमानतळावर परतले. वैमानिकाने इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती दिली तेव्हा इंडिगोचे विमान गुवाहाटी विमानतळावरून दिब्रुगडला निघाले होते, असे सांगण्यात आले, त्यानंतर विमान गुवाहाटीच्या गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले.

विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचे कारण तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. गुवाहाटी येथे उतरल्यानंतर लगेचच विमानातील सर्व प्रवाशांना डी-बोर्ड करण्यात आले आणि विमान तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र, याप्रकरणी इंडिगोकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT