Air India
Air India  Dainik Gomantak
देश

Air Ticket Price: दुबई परवडलं पण दिल्लीहून मुंबई नको, डोमॅस्टिक फ्लाइटचे भाडे गगनाला भिडले

Manish Jadhav

Air Ticket Price: डोमॅस्टिक फ्लाइटचे भाडे (Domestic Flight Fare) अचानक गगनाला भिडले. विशेषत: जर तुम्हाला दिल्ली ते काही शहरांसाठी 24 तास अगोदर विमान तिकीट बुक करायचे असेल तर तुम्हाला मोठा धक्का बसले.

या डोमॅस्टिक फ्लाइटच्या तिकीटांची किंमत आंतरराष्ट्रीय प्लाइट्सपेक्षा खूप जास्त आहे. 1 जून, बुधवारी दिल्ली ते मुंबई फ्लाइटचे (Delhi to Mumbai Flights) तिकीट ऐकून प्रवासी थक्क झाले.

वन-वे नॉन स्टॉप फ्लाइटसाठी सर्वात स्वस्त पर्याय 19,000 रुपयांचा आहे. तर 1 जून रोजी दिल्ली ते दुबई फ्लाइटचे (Delhi to Dubai Flights) भाडे 14,000 रुपये आहे. त्यामुळे दिल्लीहून दुबईला जाण्यापेक्षा दिल्लीहून मुंबईला जाणे महाग झाले आहे.

दिल्ली ते कोची भाडे रु. 22,000

दरम्यान, 1 जूनसाठी दिल्ली (Delhi) ते कोचीचे वन-वे नॉन स्टॉप तिकीट 22,000 रुपयांपासून सुरु होते. तर, कोलकाता ते चेन्नईचे तिकीट सुमारे 14,000 रुपये होते. केवळ दिल्लीतच नव्हे तर मुंबई आणि इतर शहरांमधून देशांतर्गत प्रवासासाठीही तिकीट दर वाढवण्यात आले आहेत.

1 जून रोजी, मुंबई ते लेहचे सर्वात स्वस्त तिकीट 24 तास अगोदर खरेदी केल्यावर 22,500 रुपयांना उपलब्ध होते. तर कोचीसाठी 20,000 रुपयांना मिळत होते. तर पूर्व आणि उत्तर-पूर्व मार्गांची तिकिटे सामान्यतः महाग होती.

गो-फर्स्टची उड्डाणे बंद झाल्याचा परिणाम

गो-फर्स्ट फ्लाइटची उड्डाणे बंद झाल्याने नॉन-स्टॉप फ्लाइटच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. एका एअरलाईन अधिकाऱ्याने सांगितले की, “GoFirst ची उड्डाणे बंद झाल्यामुळे आणि मंगळवारी जोरदार वादळामुळे दिल्लीहून फ्लाइटचे भाडे वाढले आहे.

वादळामुळे उड्डाणे वळवावी लागली आहेत. बुधवारी, दिल्ली ते मुंबई (Mumbai) पुढील तीन दिवसांसाठी वन-वे नॉन स्टॉप भाडे अनुक्रमे 13,000 रुपये, 11,500 रुपये आणि 10,500 रुपये होते.

पूर्व आणि ईशान्येकडील शहरांसाठी भाडे कमी

काही ठिकाणांचे भाडे मुंबईपेक्षा खूप जास्त होते. परंतु पूर्व आणि ईशान्येकडे जाणाऱ्या प्लाइट्सचे भाडे कमी होते. मुंबई ते कोलकाता फ्लाइट तिकीट 7,200 रुपये आणि बागडोगरासाठी 8,300 होते. तर, मुंबई ते दिल्लीचे भाडे 4,700 रुपये होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

Goa Today's Live News Update: पणजी कधीच सोडणार नाही, अनेकांची स्वप्न ही स्वप्नच राहतील! मोन्सेरात

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

SCROLL FOR NEXT