Aero plane  Dainik Gomantak
देश

दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या विमानात धूर; पाकिस्तानमध्ये केले आपत्कालीन 'लॅंडींग'

कतार एअरवेजच्या QR579 विमानाने दिल्लीहून दोहाला उड्डाण केले होते.

दैनिक गोमन्तक

दिल्लीहून सोमवारी दोहाला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमानाचा मोठा अपघात टळला. उड्डाणादरम्यान या फ्लाइटमधून अचानक धूर येऊ लागला, त्यानंतर ते पाकिस्तानमधील कराची विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. या विमानात 100 प्रवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कतार एअरवेजच्या QR579 विमानाने दिल्लीहून दोहाला उड्डाण केले. यादरम्यान विमानाच्या 'कार्गो होल्डमधून' अचानक धूर येऊ लागला. यानंतर विमान पाकिस्तानकडे वळवून कराची (Karachi) विमानतळावर (Airport) सुरक्षित लँड करण्यात आले. विमानाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कतार एअरवेजने या घटनेवर एक निवेदन जारी केले. एअरवेजकडून सांगण्यात आले की, विमानाची तपासणी केली जात आहे, तसेच प्रवाशांना दोहा येथे नेण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रवाशांच्या (Passengers) गैरसोयीबद्दल एअरवेजने माफी मागितली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT