Delhi Blast Dainik Gomantak
देश

Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये मोठा स्फोट, 8 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती; VIDEO

Delhi Red Fort Blast: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Delhi Red Fort Blast: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. एका उभ्या असलेल्या कारमध्ये हा मोठा स्फोट झाला. त्यानंतर कारला आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात नसून दहशतवादी कारवायांशी संबंधित स्फोट असण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ तपास सुरु केला आहे.

दिल्लीत भीषण स्फोट

लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ ही धक्कादायक घटना घडली. कारमध्ये स्फोट होताच परिसरात धावपळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पाहता पाहता या स्फोटामुळे बाजूला उभ्या असलेल्या तीन ते चार गाड्यांना देखील आग लागली. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरुन आलेले फोटो आणि व्हिडिओ थरारुन टाकणारे आहेत. जळत्या कारच्या अगदी जवळच मृतदेह पडलेला दिसत आहे, ज्यामुळे स्फोट किती भयानक होता, याचा अंदाज येतो. तसेच, अनेक गाड्या जळून खाक झाल्या असून त्या पूर्णपणे क्षतिग्रस्त झाल्या आहेत.

दहशतवादी विरोधी पथके घटनास्थळी दाखल

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांनी तात्काळ हालचाली सुरु केल्या आहेत. दिल्ली पोलीस दलाची स्पेशल सेल (Special Cell) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (National Investigation Agency - NIA) पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. या स्फोटामागे घातपात किंवा दहशतवादी कारवायांची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे तपास यंत्रणांनी घटनेच्या प्रत्येक पैलूचा अत्यंत बारकाईने तपास सुरु केला आहे. बॉम्ब निकामी करणारे पथक आणि न्यायवैद्यक विज्ञान पथक देखील पुरावे गोळा करत आहेत.

लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मेट्रो स्टेशनच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ज्या कारमध्ये स्फोट झाला, त्या कारमध्ये नेमके कोण लोक होते, कार दिल्लीची होती की बाहेरची, स्फोटासाठी नेमके कोणते स्फोटक वापरले गेले, याचा तपास सुरु आहे. या स्फोटाचा तपास आता दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि एनआयए या दोन्ही प्रमुख दहशतवादी विरोधी तपास यंत्रणांच्या हातात असल्यामुळे या घटनेमागील सत्य लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. या स्फोटामागे केवळ अपघात आहे की, मोठी घातपाती योजना आहे, यावर देशाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रात्रीचं दाट धुकं अन् समोरचं काहीच दिसेना, ड्रायव्हरनं लढवली अशी शक्कल की तुम्हीही म्हणाल 'नादच खुळा'! पाहा व्हिडिओ

Assonora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Unity Mall Goa: युनिटी मॉलच्या कामाला ब्रेक; न्यायालयाकडून 'जैसे थे' स्थितीचे आदेश

IND vs BAN Series: तणावाच्या सावटात टीम इंडियाचा बांगलादेश दौरा? BCB कडून वेळापत्रक जाहीर; बीसीसीआयच्या भूमिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

Saligao Double Murder: साळगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयिताची आता खैर नाही! गोवा पोलिसांनी उचललं मोठं पाऊल; पळवाटा केल्या बंद!

SCROLL FOR NEXT