Delhi Raod Accident Twitter/@ANI
देश

Delhi Raod Accident: दिल्लीच्या सीमापुरीमध्ये भीषण अपघात, फुटपाथवर झोपलेल्या लोकांना ट्रकने चिरडले

आतापर्यंतच्या तपासात अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला, तर 1 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीच्या सीमापुरी भागात काल रात्री एका वेगवान वाहनाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना तुडवले, ज्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला, तर 1 जण जखमी झाल्याची माहिती आहे. हे पाच जण फुटपाथवर झोपले असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंतच्या तपासात हा अपघात टेम्पोमुळे झाला आहे असे समजले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आले. तर चौथ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात ठार झालेल्यांची ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चौघेही दिल्लीतील सीमापुरी येथील रहिवासी आहेत. यामध्ये न्यू सीमापुरी येथील 52 वर्षीय करीम, 25 वर्षीय छोटे खान, 38 वर्षीय शाह आलम, साहिबााबाद येथील 45 वर्षीय राहुल यांचा समावेश आहे. याशिवाय जखमींमध्ये साहिबााबादचा रहिवासी 16 वर्षीय मनीष आणि ताहिरपूर, दिल्लीचा 30 वर्षीय प्रदीप यांचा समावेश आहे. या घटनेत सहभागी असलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात ट्रक डीटीसी डेपोच्या रेड लाईट ओलांडून डीएलएफ टी पॉइंटकडे जात होता. चालकाने बेदरकारपणे रस्ता दुभाजकावर झोपलेल्या सहा जणांना चिरडले. यातील चौघांना सीमापुरी पोलिसांनी जीटीबी रुग्णालयात हलवले . मात्र, दोघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे दुसऱ्या जखमीचा प्राथमिक उपचारातच मृत्यू झाला. त्याचवेळी उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. अद्याप दोन जण रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT