Delhi Pollution Latest News  Dainik Gomantak
देश

Delhi Pollution : दिल्लीतील प्रदूषणामुळे प्राथमिक शाळा बंद; भाजपची केजरीवाल सरकारकडे मागणी

Delhi Pollution Latest News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानी दिल्लीतील प्राथमिक शाळा उद्या, 5 नोव्हेंबरपासून बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi Pollution Latest News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानी दिल्लीतील प्राथमिक शाळा उद्या, 5 नोव्हेंबरपासून बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. यासोबतच इयत्ता 5वी वरील सर्व वर्गांसाठी मैदानी क्रियाकलापांवरही बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीत वाहनांसाठी सम-विषम लागू करण्याबाबतही विचार केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. भाजपकडून शाळा बंद करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर अखेर दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, नोएडा प्राधिकरणाने काल आदेश जारी करून इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या सर्व शाळा बंद केल्या आहेत आणि त्यांना ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत. (Delhi Pollution Latest News )

प्रदूषणाबाबतही राजकारण तापले आहे. प्रदूषणाच्या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला विरोधकांकडून घेरले जात आहे. भाजपच्या वतीने दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता आणि राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी दिल्लीतील सर्व शाळा बंद करण्याची मागणी केली होती.

काय होती भाजपची मागणी?

याआधी दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले होते, "आज प्रदूषण इतकं आहे की मुलांच्या जीवाशी खेळलं जातंय. आणि माझी दिल्ली सरकारकडे मागणी आहे की, दिल्लीच्या शाळा बंद ठेवा आणि या निष्पाप लोकांच्या आरोग्याशी खेळू नका."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

Porvorim Shooting Case: पर्वरी गोळीबारप्रकरणी आठवा संशयित मुंबईत जेरबंद; चुनाभट्टीत सापळा रचून गुन्हे शाखेची कारवाई

Pakistan Airstrike Afghanistan: गाढ झोपेत असताना काळाचा घाला! पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ला; लहान मुलांसह 22 ठार

Goa IDC E Auction: गोव्यात 50 भूखंडांचा ई-लिलाव; वेर्णा, लाटंबार्से अन् किटलातील भूखंडांसाठी 'आयडीसी'ची नोटीस जारी

SCROLL FOR NEXT