Sonika Yadav weightlifting Video Dainik Gomantak
देश

VIDEO: 'वो स्त्री है... कुछ भी कर सकती है', 7 महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिनं 145 किलो वजन उचललं, व्हिडिओ पाहून तुम्हीही मोटिव्हेट व्हाल

Sonika Yadav weightlifting Video: असं म्हटलं जातं की “जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही.” याचा प्रत्यय देत दिल्ली पोलिस दलातील एका महिला कॉन्स्टेबलने इतिहास रचला आहे.

Sameer Amunekar

असं म्हटलं जातं की “जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही.” याचा प्रत्यय देत दिल्ली पोलिस दलातील एका महिला कॉन्स्टेबलने इतिहास रचला आहे. सात महिन्यांच्या गर्भावस्थेत असूनही तिने वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि तब्बल १४५ किलोग्रॅम वजन उचलून सर्वांना अचंबित केले.

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे आयोजित अखिल भारतीय पोलिस वेटलिफ्टिंग क्लस्टर २०२५-२६मध्ये दिल्ली पोलिसातील कॉन्स्टेबल सोनिका यादवने दमदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. तिच्या स्टेजवर उतरण्यापूर्वी कोणीही असा अंदाज लावला नव्हता की ती इतिहास रचणार आहे. सामान्यतः गर्भधारणेदरम्यान महिलांनी शारीरिक श्रम कमी करावा असा सल्ला केला जातो. मात्र सोनिकाने तिच्या ध्येयासाठी स्वतःला सिद्ध केले.

मे महिन्यात ती गर्भवती असल्याचे समजल्यानंतर अनेकांना वाटले की सोनिका प्रशिक्षण थांबवेल. तिचे पतीदेखील सुरुवातीला याबाबत साशंक होते. परंतु सोनिकाने आपला फिटनेस रूटीन आणि वेटलिफ्टिंगचा सराव बंद केला नाही.

सोनिका म्हणते, “गर्भवती असल्याने कमजोर व्हावं, असा समज लोकांत आहे. पण योग्य मार्गदर्शन आणि योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास आपण आणखी मजबूत होऊ शकतो.

तिने इंटरनेटवर शोध घेताना लुसी मार्टिन्स नावाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टरबद्दल वाचले, जिने स्वतःच्या गर्भावस्थेतही वेटलिफ्टिंग चालू ठेवले होते. सोनिकाने तिच्याशी सोशल मीडियावर संपर्क साधला आणि गर्भावस्थेत सुरक्षित प्रशिक्षण कसे ठेवावे याबाबत मार्गदर्शन घेतले.

स्पर्धेतील दमदार प्रदर्शन

स्पर्धेदरम्यान सोनिकाने १२५ किलो स्क्वॅट, ८० किलो बेंच प्रेस, १४५ किलो डेडलिफ्ट.

विशेष म्हणजे स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेरीत कोणीही ती गर्भवती आहे हे ओळखू शकले नव्हते. तिने सैल आणि आरामदायी कॉम्पिटिशन किट परिधान केले होते. मात्र बेंच प्रेस राऊंडनंतर तिच्या पतीने तिला हलकेच आधार देताना ही गोष्ट लक्षात आली. सत्य समोर आल्यावर संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा गडगडाट उसळला.

इतर राज्यांतील महिला पोलिस अधिकाऱ्यांनी तिच्याकडे धाव घेत तिला शुभेच्छा दिल्या, तिच्यासोबत फोटो घेतले आणि तिच्या धाडसाची दाद दिली.

सोनिकाच्या या कामगिरीमुळे अनेक महिलांना गर्भावस्थेतही फिटनेस, आत्मविश्वास आणि मानसिक ताकद राखण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दिल्ली पोलिस दलानेही तिच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

सोनिका यादवची ही कहाणी फक्त एक स्पर्धा जिंकण्याची नाही. तर मर्यादा मोडून स्वतःचं आयुष्य घडवण्याची आहे. तिची जिद्द, धैर्य आणि मेहनत अनेकांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरणार हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Honda 0 Series EV: होंडाची EV सेगमेंटमध्ये 'धमाल'! 'झीरो सीरिज'मधील 'ही' दमदार SUV लवकरच भारतात होणार लॉन्च; टाटा नेक्सॉनला देणार कडवी टक्कर

Viral Video: दूध सांडले, पाणी सांडले, मार मात्र एकालाच! आई-मुलाच्या वादाचा मजेदार VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांनीही घेतली मजा; म्हणाले...

Cricket Controversy: क्रीडा विश्वात खळबळ! ब्रॉडच्या वडिलांनी ICC आणि BCCI वर केला गंभीर आरोप, 'टीम इंडिया'बद्दल केला मोठा खुलासा

IND vs AUS Head To Head Record: टी-20 चा खरा किंग कोण? भारत-ऑस्ट्रेलिया महासंग्राम बुधवारपासून! काय सांगतो हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Goa Ration Shop: गोव्यातील रेशन दुकानदारांसाठी खूशखबर! 1 कोटींचे थकीत कमिशन मिळणार; केंद्राकडून निधी मंजूर

SCROLL FOR NEXT