Delhi Police Arrest Khalistani 2 Shooters Dainik Gomantak
देश

Khalistani Shooters: दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, कॅनडास्थित अर्शदीप डालाचे 2 मोस्ट वॉन्टेड शूटर्स गजाआड

Delhi Police: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रविवारी रात्री दिल्लीतील मयूर विहार येथून अर्शदीप डालाच्या 2 शूटर्सला अटक केली आहे.

Manish Jadhav

Delhi Police Arrest Khalistani 2 Shooters: एनआयएसह दिल्ली पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या मोस्ट वाँटेड यादीत समाविष्ट असलेला खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप डालाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रविवारी रात्री दिल्लीतील मयूर विहार येथून अर्शदीप डालाच्या 2 शूटर्सला अटक केली आहे. या अटकेदरम्यान पोलिसांनी प्रथम दोन्ही गोळीबारांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र दरम्यान दोघांनी गोळीबार सुरु केला.

यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीदरम्यान एका शूटरच्या पायाला गोळी लागली, त्यानंतर दोन्ही शूटर्संना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांना गुप्तचर माहिती मिळाली

पोलिसांनी सांगितले की, खलिस्तानी दहशतवादी (Terrorist) अर्शदीप डालाचे दोन शूटर्स दिल्लीत आले होते आणि मयूर विहारमध्ये लपून बसल्याची गुप्तचर माहिती त्यांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एक प्लॅन बनवून दोघांना अटक केली.

अटकेदरम्यान, पोलिसांची शूटर्सबरोबर चकमक झाली, ज्यामध्ये एका शूटरच्या पायाला गोळी लागली, तर दुसऱ्याला सुखरुप अटक करण्यात आली. जखमी झालेल्या शूटरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

एनआयएचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अर्शदीप डाला

दुसरीकडे, अर्शदीप कॅनडात लपून बसला असून तो त्याच्या साथीदारांसह भारतविरोधी कारवाया करत आहे, त्यामुळेच त्याचा एनआयए, दिल्ली पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या वाँटेड यादीत समावेश आहे.

अर्शदीप 'खलिस्तान टायगर फोर्स' (KTF) चा आहे. अर्शदीपला UAPA बेकायदेशीर प्रतिबंध कायद्यांतर्गतही दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. अर्शदीप हा मूळचा पंजाबमधील (Punjab) मोगा येथील रहिवासी आहे. त्याच्यावर अपहरण, खून, दरोडा, खंडणी, टार्गेट किलिंग असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अर्शदीपवर अनेक गुन्हे दाखल आहेत

अर्शदीप हा अत्यंत क्रूर गुन्हेगार आहे, त्याच्यावर पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याचा आरोप आहे. त्यासाठी पाकिस्तानकडून आर्थिक मदतही मिळत असते. अर्शदीप कॅनडामध्ये बसून देशाविरुद्ध अनेक कारवाया करतो. याशिवाय, तो भारतात आपल्या साथीदारांच्या मदतीने अपहरण, खून, दरोडे, खंडणी, टार्गेट किलिंग असे मोठे गुन्हे करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT