Omicron

 
Dainik Gomantak
देश

ब्रिटनमधून नोएडाला परतलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण

जिल्हा प्रशासनाला परदेशातून आलेल्या 4,729 लोकांची यादी प्राप्त झाली असून, त्यापैकी 1,101 लोक हे संसर्ग वाढलेल्या देशांतून आले आहेत

दैनिक गोमन्तक

नुकतेच ब्रिटनमधून गौतम बुद्ध नगरमध्ये आलेल्या पाच जणांमध्ये कोरोनाची (corona) लक्षणे आढळून आली आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, गौतम बुद्ध नगरचे सीएमओ डॉ सुनील शर्मा यांनी याला दुजोरा दिला आहे. सर्व बाधितांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत, जेणेकरून ओमिक्रॉन संसर्गाची तपासणी करता येईल.

गौतम बुद्ध नगरचे सीएमओ डॉ. सुनील शर्मा म्हणाले, संवेदनशील देशांमध्ये समाविष्ट असलेल्या इंग्लंड व्यतिरिक्त सिंगापूरहून जिल्ह्यात आलेल्या पाच जणांना कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

ते म्हणाले की, जिल्हा प्रशासनाला (administration) परदेशातून आलेल्या 4,729 लोकांची यादी प्राप्त झाली असून, त्यापैकी 1,101 लोक हे संसर्ग वाढलेल्या देशांतून आले आहेत, जेथे कोरोना विषाणूच्या नवीन ओमिक्रॉनचा संसर्ग पसरत आहे.

दिल्लीत कोरोनाच्या ओमिक्रॉन (omicron-variant) प्रकाराची लागण झालेल्यांची संख्या सहा झाली असून त्यापैकी एक जण बरा होऊन घरी परतला आहे. LNJP हॉस्पिटलला दिल्लीतील ओमिक्रॉन कडून उपचारांसाठी अधिकृत करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT