Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

''पंतप्रधानांना पॉकेटमार म्हणणं योग्य नाही…''; राहुल गांधींच्या वक्तव्यावर HC ची टिप्पणी

Delhi High Court: न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला 8 आठवड्यांच्या आत काय कारवाई केली याचा संपूर्ण अहवाल सादर करावा लागणार आहे.

Manish Jadhav

Delhi High Court On Rahul Gandhi Speech: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वक्तव्याबाबात खंडपीठाने टिप्पणी केली की, 'पंतप्रधानांना पॉकेटमार म्हणणे ही योग्य गोष्ट नाही.' यासोबतच न्यायालयाने निवडणूक आयोगाला या वक्तव्यासंबंधी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला 8 आठवड्यांच्या आत काय कारवाई केली यासंबंधी सांगावे लागणार आहे.

राहुल गांधी यांनी मोदींची तुलना पॉकेटमारांशी केली होती

गेल्या महिन्यात देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजस्थानमधील प्रचारसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, ''जसे खिसे कापणाऱ्यांच्या गटात एक जण अचानक समोर येतो आणि लक्ष दुसरीकडे वळवतो, दुसरा मागून खिसा कापून निघून जातो आणि तिसरा गरज पडेल तेव्हा लोकांना घाबरवू लागतो. हीच बाब भाजपच्या नेतृत्वातही आहे. मोदीजी लक्ष दुसरीकडे वळवतात. त्यांचे उद्योगपती मित्र लोकांचे खिसे कापतात. नंतर गृहमंत्री अमित शाह घाबरवण्याचा प्रयत्न करतात.''

23 नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या नोटीसमध्ये न्यायालयाने म्हटले होते की, निवडणूक आयोगानेच या प्रकरणी योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. याचिकाकर्ते भरत नागर यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, 22 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी पंतप्रधानांसह सर्वोच्च सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींवर घृणास्पद आरोप करणारे भाषण केले होते, ज्यामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पॉकेटमार म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT