Delhi Crime Dainik Gomantak
देश

Delhi Crime: बापच ठरला कर्दनकाळ! 21 दिवसांच्या पोटच्या जुळ्या मुलींना टाकलं मारुन; गुपचूप दफनही केलं

दिल्लीतील सुलतानपुरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका पित्याने आपल्याच जुळ्या मुलींची हत्या केली.

Manish Jadhav

दिल्लीतील सुलतानपुरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका बापाने पोटच्या जुळ्या मुलींची हत्या केली. आधी त्याने 21 दिवसांच्या नवजात मुलींना आपल्या घरी आणले. इथे त्याने दोन्ही मुलींना एक थेंबही दूध पिण्यासाठी दिले नाही.

मुलींची आई माहेरीच होती. तिचा नवरा दोन्ही मुलींबरोबर काय करणार हे तिला कळत नव्हते. आरोपीने दोन दिवस मुलींना दूध न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने पत्नीला न सांगता मुलींना पुरुनही टाकले.

दरम्यान, हे प्रकरण सुलतानपुरी येथील पूथ कलान गावचे आहे. 30 मे रोजी नीरज सोलंकी याच्या पत्नीने जुळ्या मुलींना जन्म दिला. मुलींच्या जन्माने नीरजला अजिबात आनंद झाला नाही. त्याच्या पत्नीची प्रसूती हरियाणातील रोहतक येथे झाली.

पूजाच्या आईचे घर येथे आहे. प्रसूती झाल्यापासून पूजा तिथेच राहत होती. दरम्यान, 1 जून रोजी नीरज त्याची आई चांद कौर आणि बहीण मोनिकासोबत रोहतकमध्ये सासरच्या घरी पोहोचला.

येथे त्याने पूजाला दोन्ही मुलींना (Girls) घेऊन जात असल्याचे सांगितले. पूजानेही त्याला आपल्या दोन्ही मुलींना घेऊन जाण्याची परवानगी दिली. मात्र घरी आल्यानंतर नीरजने दोन्ही मुलींना पिण्यासाठी एक थेंबही दूध दिले नाही. दोन दिवसांपासून उपासमारीने मुलींचा मृत्यू झाला.

मुली मृतावस्थेत असल्याचे पाहून नीरजने वडील बिजेंद्र यांना याबाबत कळवले. त्यानंतर नीरज, त्याचे वडील बिजेंद्र आणि भाऊ दिनेश यांनी रामबाग येथील स्मशानभूमीत जाऊन मुलींवर अंत्यसंस्कार केले.

पूजाच्या भावाला माहिती मिळाली

याबाबत पूजा किंवा तिच्या कुटुंबीयांनाही काहीही सांगण्यात आले नाही. पण पूजाच्या भावाला कुठूनतरी कळलं की दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे. त्याने तात्काळ पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी (Police) बिजेंद्रला पुन्हा अटक केली. मात्र कुटुंबातील उर्वरित सदस्य घटनास्थळावरुन फरार झाले. पोलिस मुख्य आरोपी नीरज, दिनेश, चांद कौर आणि मोनिका यांचा शोध घेत आहेत. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT