Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 22 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला 'तो' साधूच्या वेशात समोर आला; अमेठीत मायलेकाच्या भेटीचा भावूक क्षण

Viral Video: 22 वर्षांनंतर साधू म्हणून घरी परतलेल्या आपल्या मुलाच्या घर वापसीसाठी वडील आता आपली शेती गहाण ठेवण्याच्या तयारीत आहेत.

Manish Jadhav

Viral Video: 22 वर्षांनंतर साधू म्हणून घरी परतलेल्या आपल्या मुलाच्या घर वापसीसाठी वडील आता आपली शेती गहाण ठेवण्याच्या तयारीत आहेत. खरे तर, साधू बनलेला तरुण भंडारा आयोजित करुनच घरी परतणार आहे. कुटुंबातील सदस्य यासाठी 3 लाख 60 हजार रुपयांची व्यवस्था करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, खरौली गावचे रतिपाल दिल्लीत काम करतात. त्यांचा मुलगा पिंकू फेब्रुवारी 2002 मध्ये बेपत्ता झाला होता. बराच शोध घेऊनही तो सापडला नाही. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. 27 जानेवारी रोजी एक तरुण सारंगी वाजवत साधूच्या वेशात गावात पोहोचला आणि त्याने आपली ओळख काका आणि गावातील इतर लोकांना सांगितली. यानंतर गावकऱ्यांनी यासंबंधीची माहिती त्याच्या वडिलांना दिली.

दरम्यान, माहिती मिळताच रतिपाल गावात पोहोचले आणि मुलाची भेट घेतली. मुलाच्या पोटावरील खून पाहून त्याची ओळख पिंकू अशी झाली. त्याच्या घरी परतण्यासाठी कुटुंबीयांनी खूप प्रयत्न केले. पण, वडिलांना भेटल्यानंतर गावातून मिळालेली भिक्षा घेऊन तो निघून गेला. बानी गावचा रहिवासी संतोष सिंह हाही साधूच्या वेशात त्याच्यासोबत होता. तोही सात वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता त्याचे कुटुंबीयही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. फोटोवरुन ओळख पटली असून घरी परतण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे काका फौजदार यांनी सांगितले.

साधू भेटल्यानंतर आयुष्य बदलले

रतिपाल यांनी सांगितले की, वयाच्या 11 व्या वर्षी बेपत्ता झालेल्या पिंकूची दिल्लीतील एका साधूची भेट झाली होती. यानंतर तो त्यांच्यासोबत साधू म्हणून जीवन जगू लागला. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर तो भिक्षा घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला होता.

वडील रतिपाल यांनी पुढे सांगितले की, आपल्या मुलाच्या घरी वापसीसाठी गोरखपूरमध्ये भंडारा आयोजित करावा लागेल. त्यात तीन हजार साधू सहभागी होणार आहेत. दक्षिणा आणि भोजनासाठी प्रति साधू 360 रुपये दराने 11 लाख रुपये आवश्यक आहेत. बरीच विनवणी केल्यानंतर आता 3 लाख 60 हजार रुपये देऊन मुलाला परत देण्याचे मान्य करण्यात आल्याचे सांगितले. या रकमेसाठी वडील शेती गहाण ठेवण्याच्या तयारीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

SCROLL FOR NEXT