Delhi Blast Dainik Gomantak
देश

Delhi Blast: 5 साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली 'दिल्ली', हायकोर्टाबाहेर रक्ताचे पाट; 2005 च्या स्फोटात 60 हून अधिकांचा मृत्यू VIDEO

Delhi Blast Tragedy: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका उभ्या असलेल्या कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 8 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली.

Manish Jadhav

Delhi Blast Tragedy: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका उभ्या असलेल्या कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 8 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. या स्फोटामुळे कारला मोठी आग लागून परिसरामध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. सुरक्षा यंत्रणा या घटनेमागे घातपात आहे की अपघात, याचा तपास करत आहेत. मात्र, राजधानी दिल्लीत झालेला हा स्फोट आणि जीवितहानीची घटना दिल्लीला यापूर्वी हादरवून सोडणाऱ्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची आणि बॉम्बस्फोटांची आठवण करुन देणारी ठरली.

दिल्लीत (Delhi) यापूर्वी या 5 प्रमुख बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या.

मे 1996: लाजपत नगर स्फोट

21 मे 1996 रोजी दिल्लीतील प्रसिद्ध लाजपत नगर बाजार येथे हा बॉम्बस्फोट झाला होता. या भयानक घटनेत 13 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता.

जून 2000: लाल किल्ल्याजवळ दोन स्फोट

18 जून 2000 रोजी आजच्या स्फोटाप्रमाणेच, त्यावेळीही लाल किल्ल्याच्या जवळच दोन बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला होता.

ऑक्टोबर 2005: दिवाळीपूर्वी साखळी स्फोट

29 ऑक्टोबर 2005 रोजी दिवाळी सणाच्या अगदी तोंडावर दिल्लीतील पहाडगंज, गोविंदपुरी आणि सरोजिनी नगर या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 60 हून अधिक लोकांचा जीव गेला होता, तर 200 हून अधिक लोक जखमी झाले होते. दिल्लीतील दहशतवादी कारवायांमध्ये ही सर्वात मोठी आणि भयानक घटना मानली जाते.

सप्टेंबर 2008: साखळी बॉम्बस्फोट

13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीतील करोल बाग, कनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलाश-1 मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते.

सप्टेंबर 2011: दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर स्फोट

तसेच, 7 सप्टेंबर 2011 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 5 बाहेर मोठा शक्तिशाली स्फोट झाला होता. या हल्ल्यात 15 लोकांचा दुर्देवी मृत्यू, तर 79 लोक गंभीर जखमी झाले होते.

आजच्या स्फोटाचा तपास

लाल किल्ल्याजवळ झालेल्या आजच्या स्फोटाने दिल्लीकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या स्फोटामागे अपघात आहे की घातपात, याचा तपास दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि एनआयए (NIA) यांसारख्या प्रमुख तपास यंत्रणा करत आहेत. या दुर्घटनेत ज्या 8 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या स्फोटामुळे अनेक गाड्या जळून खाक झाल्या असून, परिसराचे मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT