Cow Dainik Gomantak
देश

West Bengal: माणुसकीला काळीमा फासणारी घटना, बलात्कारानंतर गरोदर गायीचा मृत्यू

West Bengal Crime: माणुसकीला काळीमा फासणारी अशी घृणास्पद घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

West Bengal Crime: माणुसकीला काळीमा फासणारी अशी घृणास्पद घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. गरोदर गाईवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 29 वर्षीय तरुणाला बुधवारी अटक करण्यात आली. ही घटना दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील नामखाना ब्लॉकमधील उत्तर चंदनपिडी भागातील आहे. गाभण गाईच्या मालकाने फिर्याद दिल्यानंतर आरोपी प्रद्युत भुईया याला अटक करण्यात आली.

स्थानिक आणि पोलिस (Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर चंदनपिडी येथील रहिवासी आरती भुईया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेजारी असलेल्या प्रद्युतने त्यांच्या घरामागील गोठ्यात प्रवेश केला आणि त्यांच्या एका गायीवर 'पाशवी बलात्कार' केला. "मध्यरात्रीच्या सुमारास बलात्कारानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने गायीचा मृत्यू झाला," असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, आरोपी प्रद्युतविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 377 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मंगळवारी त्याला काकद्वीप उपविभागीय न्यायालयात (Court) हजर केले असता, त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. चंदनपिडी गावातील एका रहिवाशाने सांगितले की, "प्रद्युतवर असंख्य आरोप आहेत. यापूर्वी त्याने शेतातील शेळ्या, वाहने आणि भाजीपाला चोरला होता."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT