Calcutta High Court Dainik Gomantak
देश

Calcutta High Court: डेंग्यूने मृत्यू झाल्यास विम्याचे पैसे मिळणार की नाही? वाचा न्यायालयाचा निर्णय

Calcutta High Court: एका सैनिकाच्या आईचा अर्जही न्यायालयाने फेटाळला. महिलेने आपल्या याचिकेत डेंग्यूमुळे मुलाच्या मृत्यूसाठी विम्याचा दावा केला होता.

Manish Jadhav

Calcutta High Court: डास हे एक शांत आणि दुष्ट शत्रूसारखे आहेत, जे देशभरात आढळतात. त्यामुळे एखाद्याला डेंग्यू झाला आणि डास चावल्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर त्याला अपघात म्हणता येणार नाही.

यासाठी अपघात विमा पॉलिसी अंतर्गत दावाही करता येणार नाही. चित्रा मुखर्जी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्याची सुनावणी करताना कलकत्ता उच्च न्यायालयाने हे निरिक्षण नोंदवले.

यासोबतच एका सैनिकाच्या आईचा अर्जही न्यायालयाने फेटाळला. महिलेने आपल्या याचिकेत डेंग्यूमुळे मुलाच्या मृत्यूसाठी विम्याचा दावा केला होता.

दरम्यान, महिलेच्या (Woman) सैनिक मुलाचा 20 डिसेंबर 2021 रोजी रुग्णालयात मृत्यू झाला. त्याला डेंग्यूचा त्रास होता. त्याला डास चावला आणि त्यामुळेच त्याचा जीव गेला, हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला.

या प्रकरणात, तो एक अपघात मानला पाहिजे. न्यायमूर्ती मौसमी भट्टाचार्य म्हणाल्या की, 'भारतात राहणे म्हणजे अतिउष्णता, प्रचंड पावसाळा, प्रचंड लोकसंख्येचा दबाव आणि डासांचा त्रास सहन करावा लागतो.

डास आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहेत आणि भारतात त्यांना टाळणे शक्य नाही.' यासह न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला.

सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी सांगितले की, 2020 मध्ये एकट्या बंगालमध्ये 5,166 डेंग्यूची प्रकरणे नोंदवली गेली होती, तर 2021 मध्ये 8,264 प्रकरणे आढळून आली होती.

सरकारी आकडेवारीचा संदर्भ देत ते म्हणाले की, 2021 मध्ये देशात डेंग्यूमुळे 1.93 लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

याशिवाय, ते पुढे म्हणाले की, आकडेवारीवरुन असे दिसून येते की, भारत (India) हा जगातील अव्वल देशांपैकी एक आहे, जिथे डेंग्यूमुळे मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे. डेंग्यू भारतातील मृत्यूच्या कारणांमध्ये 46 व्या क्रमांकावर आहे. आजकाल डास हे आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT