Dead person  Dainik Gomantak
देश

बिहारमधील कोविड सेंटरमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

घटनास्थळी पोहोचलेले जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे नेते रमाशंकर सिंह यांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

बिहारमधील सीतामढीच्या डुमरा पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या कोविड सेंटरमध्ये गुरूवारी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. कोविड सेंटरच्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या पाईपला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Bihar News)

घटनास्थळी पोहोचलेले जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे नेते रमाशंकर सिंह यांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. ही हत्या की आत्महत्या, याबाबत पोलिस (Police) तपास करत आहेत. मृताचे नाव प्रवीण गिरी असून तो बिहारच्या छपरा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याची सीतामढी येथील सदर रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये (Hospital) पाठवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT