D2M Technology Dainik Gomantak
देश

D2M Technology: डेटा, वायफायचं टेन्शन नाही! 2000च्या फोनवर इंटरनेटशिवाय पाहता येणार चित्रपट आणि LIVE सामने, 'या' नवीन तंत्रज्ञानाबद्दल जाणून घ्या

Direct-to-Mobile (D2M): भारतात लवकरच सुरू होणारे डायरेक्ट-टू-मोबाइल (D2M) तंत्रज्ञान ही क्रांती प्रत्यक्षात घडवून आणणार आहे.

Sameer Amunekar

कल्पना करा तुमच्या मोबाईलवर एकाच वेळी लाइव्ह क्रिकेट सामना, चित्रपट आणि आवडता टीव्ही शो स्ट्रीम होत आहे... तेही मोबाईल डेटा किंवा वाय-फायशिवाय! हे आता फक्त कल्पना राहिलेलं नाही. भारतात लवकरच सुरू होणारे डायरेक्ट-टू-मोबाइल (D2M) तंत्रज्ञान ही क्रांती प्रत्यक्षात घडवून आणणार आहे. हे तंत्रज्ञान तुमच्या मोबाईल फोनला थेट "टीव्ही रिसीव्हर" मध्ये रूपांतरित करणार आहे.

D2M म्हणजे काय?

डायरेक्ट-टू-मोबाइल (D2M) ही अशी प्रणाली आहे जी उपग्रह आणि ब्रॉडकास्ट टॉवरवरून थेट मोबाईल फोनला सिग्नल पाठवते. त्यामुळे व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरनेटची अजिबात आवश्यकता नसते.

  • नेटवर्क नसलेल्या भागांतही काम करते

  • इंटरनेट खर्च शून्य

  • फीचर फोनवरही चालणार

  • व्हिडिओ स्ट्रीमिंगवर कोणताही ‘जाम’ नाही

या प्रणालीद्वारे व्हिडिओ कंटेंट जणू FM रेडिओप्रमाणे थेट मोबाईलवर पोहोचेल. हे सिग्नल्स साधारण १०० मीटर पर्यंत प्रभावी असतील.

भारतामध्ये अजूनही अंदाजे २० कोटी लोक फीचर किंवा कीपॅड फोन वापरतात. D2M तंत्रज्ञानामुळे हे वापरकर्ते आता इंटरनेटशिवाय लाइव्ह टीव्ही, चित्रपट, क्रीडा, बातम्या यांचा आनंद घेऊ शकतील. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी हे तंत्रज्ञान माहिती आणि मनोरंजनाची नवी क्रांती ठरणार आहे.

कोणत्या कंपन्या करत आहेत तयारी?

लावा आणि HMD यांनी D2M सपोर्ट असलेले फीचर फोन तयार करण्यास सुरुवात केली आहे.
या फोनची किंमत अंदाजे ₹२,००० ते ₹२,५०० असेल. हे फोन टाटा ग्रुपची कंपनी सांख्य लॅब्स विकसित केलेल्या SL-3000 चिपसेटवर आधारित असतील.

गेल्या वर्षी सांख्य लॅब्सची टाटाच्या तेजस नेटवर्क्समध्ये विलीन प्रक्रिया पूर्ण झाली.लावाचे CMO संजिव अग्रवाल यांनी सांगितले की हे फोन पुढील सहा महिन्यांत बाजारात उपलब्ध होतील.

D2M प्रसारण कुठून सुरू होणार?

प्रारंभी, प्रसार भारती या तंत्रज्ञानाद्वारे कंटेंट प्रसारित करणार आहे. त्यामुळे:

  • दूरदर्शन

  • ऑल इंडिया रेडिओ

यांसारखे सरकारी चॅनल्स सर्वप्रथम D2M वर उपलब्ध होतील. भविष्यात हे तंत्रज्ञान स्मार्टफोनमध्येही जोडण्याची योजना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: अडकलेली कामे मार्गी लागणार! 'या' 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राहू ग्रहाची 'युवावस्था' पालटणार नशीब

Shikhar Dhawan: बांगलादेशातील हिंदू महिलेवरील अत्याचारावर संतापला 'गब्बर'; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, "अशी हिंसा सहन केली जाणार नाही!"

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT