Cyclone Tej Dainik Gomantak
देश

Cyclone Tej: अरबी समुद्रात चक्रीवादळ; पुढील 24 तासात वाढणार तीव्रता

किनारपट्टी भागात पावसाची शक्यता?

Akshay Nirmale

Cyclone Tej: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी वतर्वली होती. पुढील 24 तासात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होऊ शकते.

हे वादळ मुंबई आणि गुजरातसह इतर किनारी भागात धडकू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु वादळाच्या ताज्या मार्गावरून असे दिसून येते की त्याचा भारतीय किनारपट्टीला काहीही धोका असणार नाही. हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकत आहे.

दरम्यान, 21 ऑक्टोबरच्या सकाळपासून हवामानात बदल जाणवेल, असे आयएमडीने म्हटले होते.

अरबी समुद्रातील या वर्षातील हे दुसरे चक्रीवादळ आहे. हिंद महासागरातील चक्रीवादळांच्या नावासाठी स्वीकारलेल्या सूत्रानुसार या वादळाला 'तेज' असे नाव देण्यात आले आहे.

रविवारी हे वादळ ओमान, येमेनची दक्षिण किनारपट्टी या दिशेला सरकू शकते. दरम्यान, काही संस्थांनी ते पाकिस्तान आणि गुजरात किनारपट्टीकडे जाऊ शकते, असेही म्हटले होते.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि मुंबईच्या किनारपट्टीसह अनेक भागात जोरदार वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT