Mandous Cyclone Dainik Gomantak
देश

Mandous Cyclone: चक्रीवादळाच्या भीतीपोटी शाळांना सुट्टी; गोव्यासह देशात काय परिणाम होणार?

बंगालच्या उपसागरात मेंडोस नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mandous Cyclone Updates : गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारत वगळता उर्वरित भागांमध्ये थंडीच्या लाटेचा प्रकोप दिसत नाहीए. समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून दक्षिणेतील काही राज्यांना पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.

बंगालच्या उपसागरात मेंडोस नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे पोंडिचेरी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे तिन्ही राज्यांमध्ये मुसळधार पावसासोबत वादळी वारेही वाहत आहेत. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून तिथल्या शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिकांना देखील सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे चेन्नईपासून 900 किमी आग्नेयेस जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान याचा गोवा आणि महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसला तरी दमट आणि ढगाळ वातावरण तसेच काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. याचे हळूहळू चक्रीवादळात रूपांतर होत आहे. आज हे वादळ नैऋत्य बंगालचा उपसागर, उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्‍यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर ते तामिळनाडू, पुद्दुचेरी ओलांडून 10 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT