Jammu And Kashmir Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून CRPF जवानाची हत्या

जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून सीआरपीएफ जवानाची हत्या करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांतील दहशतवाद्यांचा हा चौथा हल्ला आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (CRPF) जवानाची हत्या केली. गेल्या तीन दिवसांतील हा चौथा दहशतवादी हल्ला आहे. जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) शोपियानमधील छोटेपोरा गावात सुट्टीवर गेलेल्या सीआरपीएफ (CRPF) जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियांचे रहिवासी असलेले सीआरपीएफ जवान मुख्तार अहमद दोही यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. (CRPF trooper killed by terrorists in Shopian)

पीटीआय या वृत्तसंस्थेने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, 'परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध सुरु करण्यात आला आहे.'

दरम्यान, काश्मीरमध्ये दोन गावातील प्रमुखांची हत्या झाल्यानंतर ही घटना घडली आहे. याआधी खानमोहचे सरपंच बशीर अहमद भट आणि त्यानंतर शुक्रवारी कुलगाममध्ये भाजपशी संबंधित शब्बीर अहमद मीर यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. श्रीनगरच्या सीमेवर दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT