Female Commando Dainik Gomantak
देश

CRPF: दहशतवाद्यांचा बिमोड करणार महिला कमांडो सज्ज, सैन्य ऑपरेशनमध्ये...

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) महिला जवानांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवायांमध्ये पाठवण्याची तयारीही सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

Female Commando: केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) महिला जवानांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवायांमध्ये पाठवण्याची तयारीही सुरु आहे. निमलष्करी दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चकमकीच्या ठिकाणी तैनात करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा विचार केला जात आहे. असे झाल्यास, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जिथून दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमकीच्या बातम्या येत असतात.

सीआरपीएफचे महानिरीक्षक (श्रीनगर सेक्टर) चारु सिन्हा यांनी सांगितले की, या योजनेवर सध्या चर्चा सुरु आहे. ते पुढे म्हणाले की, 'सुरक्षा दलात पुरुषांचे वर्चस्व आहे. नाकाबंदी आणि शोध मोहिमेदरम्यान महिलांना (Women) अस्वस्थ वाटत असल्याचे आपण पाहिले आहे. पूर्वी असा विचार केला जात नसे पण आता परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे एक प्रयोग म्हणून महिला जवानांचा सहभाग वाढविण्याचा विचार सुरु आहे.'

'महिलांच्या भावना दुखावू इच्छित नाही'

सुरक्षा अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, 'जेव्हा आम्ही दहशतवादविरोधी (Terrorism) कारवाईदरम्यान घरांमध्ये जातो तेव्हा, तिथे काश्मिरी महिला असतात... आम्हाला असे वाटते की, अशा परिस्थितीत पुरुष सुरक्षा कर्मचारी पाठवू शकत नाहीत. आम्हाला त्यांच्या संवेदनांना धक्का पोहोचवायचा नाही. त्यामुळे महिला जवानांचे जाणे हा या परिस्थिती हाताळण्याचा योग्य मार्ग असेल असे आम्हाला वाटले.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT