crime police and intelligence story ghaziabad prostitution business guise spa center 9 youths arrested Dainik Gomantak
देश

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय, नऊ तरुणांना अटक

पोलिसांचा ताफा पाहून एकच खळबळ

दैनिक गोमन्तक

गाझियाबादमधील एका मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावावर वेश्याव्यवसाय केला जात होता. कौशांबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशाली परिसरात महागण मॉलच्या तळघरात या देह व्यवसायाचे काम सुरू होते. रुद्र नावाच्या स्पा सेंटरचा अश्लील व्हिडिओ पोलिसांना सापडला होता, त्यानंतर पोलिसांनी येथे छापा टाकला. पोलीस छापा टाकण्यासाठी आले तेव्हा स्पा सेंटरमधील खोल्या पाहून त्यांना आश्चर्य वाटले.

छाप्यादरम्यान स्पामधील दोन वेगवेगळ्या बंद खोल्यांमध्ये दोन जोडपी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आली. पोलिसांनी (police) केंद्रातील 9 जणांना अटक केली असून त्यात 4 मुली आणि 5 तरुणांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये केंद्र चालवणाऱ्या तरुणीचाही समावेश आहे. मात्र, स्पा सेंटरचा मालक अद्याप फरार आहे.

या प्रकरणाच्या संदर्भात सीओ इंदिरापुरम अभय कुमार मिश्रा यांनी सांगितले की, मॉलच्या स्पा सेंटरचा अश्लील व्हिडिओ (Video) पोलिसांना मिळाल्यानंतर, अतिरिक्त नगर दंडाधिकारी द्वितीय निखिल चक्रवर्ती आणि कौशांबी पोलिसांच्या पथकाने महागण मॉलच्या तळघरातील रुद्र स्पा सेंटरवर छापा टाकला. पोलिसांचा ताफा पाहून एकच खळबळ उडाली, घटनास्थळावरून पकडलेल्या तरुणांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT