crime news 21 year old woman cctv footage jumped off from sr nagar metro station hyderabad telangana Dainik Gomantak
देश

...आणि तरूणीनं उचललं टोकाचं पाऊलं

सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकरण आलं समोर

दैनिक गोमन्तक

तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिथे एका तरुणीने मेट्रो स्टेशनच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. जखमी अवस्थेत मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शबनम असे या 21 वर्षीय तरुणीचे नाव असून, ती बंजारा हिल्स येथील श्रीराम नगर भागातील रहिवासी होती. मुलीने ईएसआर मेट्रो (Metro) स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली.

तपासादरम्यान तरुणीला लव्ह मॅरेज करायचे असल्याचे पोलिसांना समजले. मात्र त्यांचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हते.

मंगळवारी तिचा घरच्यांशी लग्नावरून वाद झाला आणि ती घरातून निघून गेली. काही वेळाने तिने मेट्रो स्टेशनच्या इमारतीवरून उडी मारली. पोलिसांनी (Police) स्टेशनवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची छाननी सुरू केली. जेणेकरून या प्रकरणाची चौकशी करता येईल. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fake Wedding Party: ना सासरचं टेन्शन, ना खर्चाची चिंता! गोव्यात 'फेक वेडिंग' इव्हेंटनं तरूणांना दिला लग्नसोहळ्याचा अनुभव

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत निसर्ग कोपला, ढगफुटीमुळे घरं गेली वाहून; कित्येकजण बेपत्ता

कॅसिनोंमध्ये बेकायदा लाइव्ह गेमिंग सुरूच; पोस्टाच्या स्कॅमनंतर सरदेसाईंचे आणखी एक स्टिंग ऑपरेशन, शेअर केला VIDEO

Team India: टीम इंडियावर संकटाचे ढग! रोहित-विराट एकदिवसीय विश्वचषक खेळणार नाही? समोर आली मोठी अपडेट

Sub-Junior Aquatics Championships: गोव्याच्या पूर्वी नाईकचा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दमदार परफॉर्मन्स; 2 सुवर्ण, 1 रौप्य जिंकलं

SCROLL FOR NEXT