Cow Urine Dainik Gomantak
देश

Cow Urine Unfit for Humans: गोमूत्र मानवांसाठी सुरक्षित नाही, संशोधनात धक्कादायक खुलासा

भारतात गाईचे गोमूत्र घरातील अंगणात शिंपडल्यास घातक विषाणू नष्ट होतात असे मानले जाते.

Puja Bonkile

Cow Urine Unfit for Humans Consumption: हिंदू धर्मात गाईचे गोमुत्र खुप पवित्र मानले जाते. तसेच घरातील अंगणात शिंपडल्यास घातक विषाणू नष्ट होतात असे मानले जाते.

घरी मंगल कार्य असल्यासही गोमूत्र शिंपडले जाते.पण हेच गोमूत्र मानवांसाठी चांगलं नाही असे देशातली प्रमुख प्राणी संशोधन संस्था भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था IVRI स्पष्ट केले आहे.

एका अहवालानुसार, हा अभ्यास बरेली-आधारित ICAR-भारतीय पशुवैद्यकीय संशोधनाद्वारे आयोजित करण्यात आला होता. या संशोधनात गाईच्या गोमुत्रात धोकादायक जीवाणू असल्याचं समोर आलं आहे.

संस्थेतल्या तीन पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार निरोगी गायी आणि बैलांमध्ये कमीतकमी 14 प्रकारचे हानीकारक जीवाणू असतात, ज्यात Escherichia Coli असतात. यामुळे पोटाचे संसर्ग होऊ शकतात.

या संस्थेच्या संशोधनाचे निष्कर्ष रिसर्चगेट या ऑनलाइन संशोधन वेबसाइटवर प्रकाशीत केले गेले आहेत. गायी म्हशी आणि मानवांच्या 73 मूत्र नमुन्यांचे विष्लेषण असे दर्शवते की म्हशीच्या मूत्रातील विषाणु वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गायीच्या युरिनपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे.

कोणत्याही परिस्थितीत मानवाला वापरासाठी गायीच्या गोमुत्राची शिफारस केली जाऊ शकत नाही. जून ते नोव्हेंबर 2022 दरम्यान केलेल्या अभ्यासातून निरोगी प्राण्याच्या युरिनच्या नमून्यांमध्ये संभाव्य रोगजनक बॅक्टेरिया आहेत.

अहवालानुसार गोमूत्र मानवाच्या आरोग्यासाठी योग्य नाही. संशोधनात असेही समोर आले की, गोमूत्र कर्करोग किंवा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

या संशोधनाच्या अहवालात असेही नमूद करण्यात आले की, गाळलेल्या गोमूत्रात माणसाची प्रतिकारशक्ती सुधारण्याची ताकद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT