Corona Vaccine Siddhesh Shirsat / Dainik Gomantak
देश

Corona Vaccine: भारताच्या कोवॅक्सिनला लवकरच मिळणार WHO ची संमत्ती

केंद्र सरकार (Central Govt.) विश्वातील 4 कंपन्यांच्या वॅक्सीन घेणार (Corona Vaccine)

Siddhesh Shirsat

आपल्या देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट (Corona 2nd Wave) आटोक्यात येत असली तरी संकटाचे ढग अजूनही आहेत. त्यामुळे भारत सरकार विश्वातील अजून ४ कंपन्यांच्या वॅक्सीन घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर वॅक्सीनमध्ये झायडस कॅडीला (Zydus Cadilla), बायोलॉजिकल - ई (Biological - E), नोवावॅक्स (Nova - Vax) व जेनेवा (Geneva) या व्हक्सिनचा समावेश आहे.

15 ऑगस्ट पर्यंत मिळेल 'भारतीय कोवॅक्सीन'ला संमती मिळण्याची शक्यता

भारतात बनवलेली स्वदेशी वॅक्सीन म्हणजे 'कोवॅक्सीन'चा (Covaxine) पुरवठा प्रचंड प्रमाणात वाढवला गेला आहे, आशा आहे की, लवकरच म्हणजे येत्या 15 ऑगस्टला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) कॉवॅक्सीनला संमती मिळण्याची शक्यता आहे. (Corona Vaccine)

केंद्र सरकारच्या मते, सप्टेंबर महिन्यात देशात कोरोना लसीचे एकूण उत्पादन 20 कोटी तसेच ऑक्टोबरमध्ये 25 कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात कोरोनाची दुसरी अद्याप लाट संपली नाही. आरोग्य मंत्रालयाने 8 राज्यांच्या R मूल्याबद्दल चिंता व्यक्त केली गेली होती. कोरोनामुळे संक्रमित व्यक्ती संक्रमित झालेल्या व्यक्तींच्या संख्येला R मूल्य म्हणतात. जर एखाद्या संक्रमित व्यक्तीने 1 व्यक्तीस संसर्ग पसरवला तर आर मूल्य 1 असते, परंतु जर त्याच व्यक्तीने 2 लोकांना संक्रमित केले तर हे मूल्य 2 असते.

आरोग्य मंत्रालयाच्या मतानुसार, केरळ, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश व कर्नाटक या राज्यांचे R मूल्य देशात सर्वाधिक आहे. विशेषतः केरळमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या एका आठवड्यापासून राज्यात सुमारे 20 हजार नवीन कोरोनाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. संपूर्ण देशातील 44 जिल्ह्यांपैकी, जिथे पॉसिटीव्हिटी दर (TPR) सर्वाधिक आहे, त्यात 10 जिल्हे फक्त केरळचे आहेत. मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, देशात असे 44 जिल्हे आहेत जिथे केसेसचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ज्यामध्ये मुख्यत्वे केरळ, मणिपूर, मिझोराम आणि नागालँड या राज्यांचा समावेश होतो. गेल्या आठवड्यात संपूर्ण देशाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे 50 टक्के रुग्ण केरळमधून नोंदवले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT